थेरी संघमित्रा कृतज्ञता दिवस संघमित्रा वंदना संघ कन्हान व्दारे साजरा

थेरी संघमित्रा कृतज्ञता दिवस संघमित्रा वंदना संघ कन्हान व्दारे साजरा

कन्हान : – थेरी संघमित्रा कृतज्ञता दिवस संघमित्रा वंदना संघ कन्हान च्या वतीने आज येथे साजरा करण्यात आला. सम्राट अशोक यांची मुलगी थेरी संघमित्रा ने बोधिवृक्षा चं रोपटं घेऊन मार्गशीष पौर्णिमेला श्रीलंका गाठले आणि तेथे बौद्ध धर्माचा प्रचार व प्रसार केला म्हणून बौद्ध बांधव मार्गशीष पौर्णिमेला कृतज्ञता दिवस साजरा करतात.
रविवार (दि.१९) ला डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे लामा भन्तेजी च्या प्रमुख उपस्थि तीत डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळ बुध्द वंदना घेण्यात आली. त्यानंतर एक रॅली काढून महामार्गाने कन्हान नाका नंबर सात, संताजी नगर येथील बुद्ध विहारांना भेटी देण्यात आल्या. रॅलीमध्ये थेरी संघमित्राची वेश भुषा तृप्ती शेंडे हीनी केली. शुभ्र पांढरे वस्त्र परिधान करून अंगावर पिवळा दुपट्टा घेऊन महिला रॅली मध्ये सहभागी झाल्या होत्या.

रॅलीचे समापन गणेश नगर येथील कन्हान बुद्ध विहारात करण्यात आले. येथे छोटे खानी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सोनाली शिलालेख, जुही बोरकर, अनिता दहिवलकर यांनी थेरी संघमित्राच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन सारिका धारगावे यांनी तर आभार दिलाशा दहिवलकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटी भोजनदान करून कार्यक्रमाचे समापन करण्यात आले. कल्पना पाटील, रेखा रामटेके, सुकेशनी बागडे, रमा मेश्राम, वंदना शेंडे, गुड्डी सांगोडे, नीता मेश्राम, अनिता सोमकुवर, गौतमी नारनवरे हयांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विशेष प्रयत्न केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

सयुक्त कुंटुबाचे कर्ते पुरूष श्री कृष्णाजी मसार यांचे दु:खद निधन

Mon Dec 20 , 2021
सयुक्त कुंटुबाचे कर्ते पुरूष श्री कृष्णाजी मसार यांचे दु:खद निधन कन्हान : – आधुनिक युगात सुध्दा पिपरी-कन्हान येथील मसार सयुक्त परिवारातील सयुक्त कुंटुब पध्दतीचे पुरस्कर्ते पुरूष श्री कृष्णाजी लक्ष्मणजी मसार यांचे वृध्पकाळाच्या आजाराने दु:खद निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. कन्हान गांधी चौकात सायकल दुरूस्तीचे दुकान व खेडी (गहुहिवरा) येथे […]

Breaking News

Archives

Categories

Meta