कन्हान येथे १ जानेवारी शौर्य दिवस थाटात

कन्हान येथे १ जानेवारी शौर्य दिवस थाटात

भारतीय बौद्ध महासभा कन्हान द्वारे शौर्य दिवस थाटात साजरा

 

कन्हान : – १ जानेवारी शौर्य दिवसा निमित्य भारतीय बौद्ध महासभा कन्हान द्वारे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे कार्यक्रमाचे आयोजन करून शौर्य दिवस थाटात साजरा करण्यात आला.
शनिवार (दि.१) जानेवारी ला भारतीय बौद्ध महासभा कन्हान द्वारे शौर्य दिवसा निमित्य डॉ बाबा साहेब आबेंडकर चौक कन्हान येथे प्रमुख अतिथी मिल्ट्रीमॅन रिटायर्ड सुबेदार मेजर जगदीश कानेन्हकर, रिटायर्ड हवलदार रमाकांत पानतावने, नायक जय पाटिल, नायक विलास मेश्राम यांच्या हस्ते डॉ बाबा साहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भीमा कोरेगांव स्तंभ स्मारकावर पुष्पहार अर्पण करून, क्रांती मशाल प्रज्वलित व पुष्पचक्र अर्पित करून बुध्द वंदनाने कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमात ट्रेडिश नल इंस्टिट्यूट ऑफ शोतो कराटे एसोसिएशन, जापान कराटे एसोसिएशन चे खेळाडुंनी मास्टर रिदम शेंडे च्या नेतृत्वात ब्लैक बेल्ट धारी मनोज बर्वे, रोशन बर्वे, अमर सोनेकर, हर्षित रायपुरकर, नैतिक खंडाईत, नैपुण्य खंडाईत,माही शेंडे, आराध्या सेंगर, मानव शेंडे सह चंमुनी कराटे प्रस्ताविक सादर केले. तदंतर मार्गदर्शन करून शौर्य दिवस थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी भारतीय बौद्ध महासभाचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी व नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

 

सर्व धर्म समभाव संघटन द्वारे शौर्य दिवस थाटात साजरा

कन्हान : – सर्व धर्म समभाव संघटन द्वारे शौर्य दिवस निमित्य गांधी चौक कन्हान येथे करण्यात आले असुन कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित रिटायर्ड सूबेदार मेजर जगदीश कानेन्हकर, रिटायर्ड हवलदार रमाकांत पान तावने, नायक जय पाटिल, नायक विलास मेश्राम यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करून विनम्र अभिवादन करीत शौर्य दिवस थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व धर्म समभाव संघटन अध्यक्ष चंदन मेश्राम, दिपक तिवाडे, प्रशांत मसार, राजेंद्र फुलझले, नितिन मेश्राम, राॅबिन निकोसे सह नागरिक उपस्थित होते.

भाजपा अनु:सूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका द्वारे शौर्य दिवस थाटात साजरा

 

भाजपा अनु:सूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका द्वारे शौर्य दिवसा निमित्य डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक कन्हान येथे भाजपा अनु:सूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष लीलाधर बर्वे यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भीमा कोरेगांव स्तंभ स्मारकावर पुष्पहार अर्पण करून कार्य क्रमाची सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी भाजपा अनु:सुचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे व नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांनी भीमा कोरेगांव विषया वर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास उपस्थित सर्व भाजपा पदाधिका-यानी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला व भीमा कोरेगांव स्तंभ स्मारकावर पुष्प अर्पित करित विनम्र अभिवादन करून शौर्य दिवस थाटात साजरा करण्यात आला.यावेळी भाजपा अनु:सूचित जाती मोर्चा पारशिवनी तालुका अध्यक्ष लीलाधर बर्वे, तालुका उपाध्यक्ष कामेश्वर शर्मा, जिल्हा उपाध्यक्ष रिंकेश चवरे, तालुका महामंत्री सचिन वासनि क, मयुर माटे, भाजपा कन्हान शहर महामंत्री सुनील लाडेकर, तालुका प्रसिद्धी प्रमुख शैलेश शेळके, नगर सेवक राजेंद्र शेंदरे, भाजपा ओबीसी मोर्चा कन्हान शहर अध्यक्ष अमोल साकोरे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चा कन्हान शहर उपाध्यक्ष दिपनकर गजभिये, अमन घोडेस्वार सह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

गहुहिवरा रोडवरील बांधकामाच्या लोखंडी सळाखी चोरी

Sun Jan 2 , 2022
गहुहिवरा रोडवरील बांधकामाच्या लोखंडी सळाखी चोरी कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत ४ कि मी अंतरावर असलेल्या गहुहिवरा परिसरातील माॅडन लॅड डेवलपर्स येथुन अज्ञात चोरट्याने प्लाॅट नं.१०३ येथील बांधकामाच्या लोखंडी सळाखी किंमत २५,४९७ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादी च्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील […]

Breaking News

Archives

Categories

Meta