भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर वतीने पत्रकार दिवस साजरा ; ग्रामौन्नती प्रतिष्ठाण कन्हान व्दारे बाळशास्त्री जयंती थाटात साजरी

*भाजपा पारशिवनी तालुका व कन्हान शहर वतीने पत्रकार दिवस साजरा

*ग्रामौन्नती प्रतिष्ठाण कन्हान व्दारे बाळशास्त्री जयंती थाटात साजरी

तारसा रोड कन्हान येथील भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा महामंत्री श्री रामभाऊ दिवटे यांच्या बंगल्याच्या आवारात पारशिवनी तालुका व भाजपा कन्हान शहर च्या संयुक्त विद्यमाने दर्पणकार आचार्य बाळ शास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करून कार्यक्रमास प्रामुख्याने उपस्थित मान्यवरांचा हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी भाजपा पदाधिका-यांनी पत्रकारांना शुभेच्छा देऊन उपस्थितांना मार्गदर्शन केले . आणि पदाधिका-यांच्या हस्ते कार्यक्रमास उपस्थित सर्व पत्रकार बांधवांना दुपट्टा, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून पत्रकार दिवस थाटात साजरा करण्यात आला. सुत्रसंचालन शहर महामंत्री सुनील लाडेकर यांनी तर आभार शहराध्यक्ष डॉ मनोहर पाठक यांनी मानले. याप्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा ओबीसी मोर्चा महामंत्री रामभाऊ दिवटे, भाजपा पारशिवनी तालुकाध्यक्ष अतुल हजारे, शहराध्यक्ष डॉ मनोहर पाठक, सचिन वासनिक, अमोल साकोरे, शैलेश शेळके, रिंकेश चवरे, सौरभ पोटभरे, तुलेषा नानवटकर, स्वाती पाठक, सुनंदा दिवटे, कळंबे ताई सह भाजपा पदाधि कारी प्रामुख्याने उपस्थित होते.

*ग्रामौन्नती प्रतिष्ठाण कन्हान व्दारे बाळशास्त्री जयंती थाटात साजरी
स्वामी विवेकानंद ट्रस्ट प्रणित ग्रामोन्नती प्रतिष्ठाण व्दारे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना विन्रम अभिवादन करून २१० वी जयंती निमित्य पत्रकार दिवसी स्थानिय पत्रकारांचा सत्कार करून पत्रकार दिवस थाटात साजरा करण्यात ़आला.

माजी खासदार मा. प्रकाशभाऊ जाधव यांचे अध्यक्षेत व प्रमुख अतिथी जेष्ट पत्रकार अजय त्रिवेदी, रमेश गोळघाटे, सामाजिक कार्यकर्ता भरत सावळे यांच्या हस्ते दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व पुष्प अर्पित करून अना थाची माई थोर समाज सुधारक सिंधुताई सपकाळ हयाना दोन मिनीट मौनधारण करून भावपुर्ण श्रध्दा जंली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात कऱण्यात आली. मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याविषयी प्रास्थाविक किशोर बासाडे, अजय त्रिवेदी, भरत साळवे हयानी मार्गदर्शन केले. तदंतर पत्रकार अजय त्रिवेदी, रमेश गोळघाटे, निलेश रावेकर , नितीन रावेकर, कमलसिंह यादव, शांताराम जळते, सुनिल सरोदे, रविंद्र दुपारे, गणेश खोब्रागडे, ऋृषभ बाववकर, किशोर वासाडे, धनंजय कापसीकर रोहीत मानवटकर, निलेश गाढवे, मोतीराम रहाटे आदीना शाल, प्लानर डायरी, पेन व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. मा प्रकाश भाऊ जाधव हयानी अध्यक्षिय मार्गदर्शन करून उपस्थिताना नव वर्ष आणि पत्रकार दिवसा च्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाये सुत्रसंचान ग्रामोन्नती चे कमलेश पांजरे हयावी तर आभार प्रविण गोडे हयानी व्यकत केले. कार्यर्कमाच्या यशस्विते करिता प्रतिक जाधव, सचिन साळवी, रूपेश गिरी, निशांत जाधव ह्यानी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

इंदिरा नगर कन्हान येथे घरफोडी : पोलिस प्रशासनावर ?

Sun Jan 9 , 2022
इंदिरा नगर कन्हान येथे घरफोडी #) कन्हान पोलीस स्टेशन ला १७५५० रूपयांच्या मुद्देमाल चोरीचा गुन्हा दाखल. कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत २ किमी अंतरावरील इंदिरा नगर कन्हान येथे अज्ञात चोरानी घराच्या दाराची कडी कोंडा तोडुन घरात प्रवेश करून एकुण १७,५५० रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात […]

Breaking News

Archives

Categories

Meta