गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रथम अध्ययनस्तर निश्चित करा

*गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रथम अध्ययनस्तर निश्चित करा*

*गटशिक्षणाधिकारी तभाने मॅडम यांची सूचना*

*वाचन प्रकल्पांतर्गत शाळांना भेटी व मार्गदर्शन*

कन्हान – गुणवत्ता पूर्ण शिक्षण मिळणे हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे. त्यामुळे प्रत्येकापर्यंत गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहचविण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर निश्चित करुन मग वाटचाल केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा योग्य उपयोग होईल, असे आवाहन वाचन प्रकल्प निरीक्षक व रामटेक पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तभाने मॅडम यांनी केले.


येथील धर्मराज प्राथमिक शाळेत आज (ता १२) दिलेल्या भेटीत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षण विस्तार अधिकारी सौ रामटेके मॅडम उपस्थित होत्या. प्रथम गटशिक्षणाधिकारी तभाने मॅडम यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांनी तर शिक्षण विस्तार अधिकारी सौ रामटेके मॅडम यांचे स्वागत सौ चित्रलेखा धानफोले यांनी केले.

धर्मराज प्राथमिक शाळेतील शिक्षकांना मार्गदर्शन करतांना गटशिक्षणाधिकारी तभाने मॅडम म्हणाल्या की, प्रत्येक शिक्षकांमध्ये प्रथम ‘स्व’ भावना निर्माण झाली पाहिजे. प्रत्येक मूल शिकू शकते हा आत्मविश्वास घेऊन शिक्षकांनी अध्यापन कार्याला सामोरे गेले पाहिजे. प्रत्येक विद्यार्थ्यांने अपेक्षित ध्येय गाठण्यासाठी व योग्य मार्गदर्शनासाठी प्रथम अध्ययनस्तर निश्चित करुनच मार्गदर्शन करायला हवे. तरच ते प्रभावी औषधासारखे काम करेल. यावेळी त्यांनी पारशिवनी तालुक्यात गटशिक्षणाधिकारी श्री कैलास लोखंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आलेल्या अध्ययनस्तराचे कौतुक करुन शिक्षकांनी शाळा बंद काळात सुद्धा याचा पुरेपूर उपयोग करावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचालन हर्षकला चौधरी यांनी तर आभार प्रिती सुरजबंसी यांनी मानले. यावेळी मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये यांच्यासह शिक्षक सौ चित्रलेखा धानफोले, श्री भिमराव शिंदेमेश्राम, श्री किशोर जिभकाटे, श्री राजू भस्मे, श्री अमित मेंघरे, कु. पूजा धांडे, कु. अर्पणा बावनकुळे, कु. शारदा समरीत, कु. प्रीती सुरजबंसी व कु. हर्षकला चौधरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

मुख्य महामार्गावर स्पीड ब्रेकर लावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा

Thu Jan 13 , 2022
मुख्य महामार्गावर स्पीड ब्रेकर लावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे रास्ता रोको आंदोलनाचा ईशारा कामठी  : तालुका वडोदा ते कुही नॅशनल हायवे मार्गावर नेहमी जीवघेणे अपघात होत असुन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहे . वडोदा पासून 500 मीटर अंतरावर असलेले अपघाती वळण, टर्निंग पॉईंट, येथे रोज अपघात होतात हे टाळण्या […]

Breaking News

Archives

Categories

Meta