कोलार नदीच्या डोहात आढळला मृतदेह

कोलार नदीच्या डोहात आढळला मृतदेह 

सावनेर :  मागील दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा नंदाजी बाबा देवस्थान हेटी परिसरातील कोलार नदीच्या डोहात मृतदेह आढळून आल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास उघडकीस आल्याने खळबळ उडाली . उत्तम बंडू वाघ ( वय ३२ , पानउबाळी , ता . कळमेश्वर ) असे मृत युवकाचे नाव आहे .

मिळालेल्या माहितीनुसार उत्तम कुटुंबासह हेटी गावातील नंदाजी बाबा देवस्थानात पूजा अर्चना करण्यासाठी आला होता . देवदर्शनानंतर सर्वांनी सहभोजन केले . यादरम्यान जवळपास चार वाजताच्या सुमारास तो बेपत्ता होता . त्यामुळे कुटुंबीयांनी चौकशी करणे व शोध घेणे सुरू केले होते . कुठेही पत्ता लागत नसल्याने हेटी शिवारातील कोलार नदी पात्रात शोध घेत असताना परिवारास त्याचा मृतदेह आढळून आला

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

अपघातात युवकाचा जागीच मृत्यू ; सावनेर खापा मार्गावरील घटना.

Wed Jan 19 , 2022
अपघातात युवकाचा जागीच मृत्यू सावनेर खापा मार्गावरील घटना. सावनेर : सावनेर खापा मार्गावरील सावनेर येथे रेल्वे क्रॉसिंग जवळ चारचाकी व दुचाकी ची धडक झाल्याने सावनेर येथिल युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृतक नामदेव धनराज ढवळे राहणार सावनेर वय २८ वर्ष आपल्या मित्राला सोडण्यासाठी दुचाकी क्र […]

Breaking News

Archives

Categories

Meta