कन्हान ला बाबा ताजुद्दीन जन्मोत्सव थाटात साजरा

कन्हान ला बाबा ताजुद्दीन जन्मोत्सव थाटात साजरा

#) ताज ऑक्सी सिल्वर, स्वामी विवेकानंद नगर मित्र परिवार द्वारे कार्यक्रमाचे आयोजन.

कन्हान : – ब्रुक बाॅंड कंपनी समोर ताज ऑक्सी सिल्वर, स्वामी विवेकानंद नगर मित्र परिवार द्वारे ताजुद्दीन बाबा यांच्या १६१ व्या जन्मोत्सव निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करून बाबा ताजुद्दीन यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण व प्रसाद वितरण करून बाबा ताजुद्दीन जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला.


गुरुवार (दि.२७) जानेवारी ला बाबा ताजुद्दीन यांच्या १६१ व्या जन्मोत्सव निमित्य ताज ऑक्सी सिल्वर, स्वामी विवेकानंद नगर मित्र परिवार द्वारे ब्रुक बाॅंड कंपनी समोर कार्यक्रमाचे आयोजन करून मान्य वर नागरिकांनी बाबा ताजुद्दीन यांच्या प्रतिमेचे पुजन व केक कापुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावेळी नागरिकांना चिवडा व बासुंदी च्या प्रसाद वितरण करून ताजुद्दीन बाबा यांचा जन्मोत्सव थाटात साजरा करण्यात आला. याप्रसंगी बहु संख्येने नागरिकांनी ताजुउद्दीन बाबा च्या प्रतिमेचे दर्शन घेऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्य प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय सावनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन

Fri Jan 28 , 2022
सावनेर :  25 जानेवारी 2022 राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्य प्रशासकीय इमारत तहसिल कार्यालय सावनेर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,मा.मतदार नोंदणी अधिकारी 49 सावनेर वि.स.म. तथा उपविभागीय अधिकारी सावनेर श्री अतुल म्हेत्रे यांचे अध्यक्षते खाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.सदर कार्यक्रमात उत्कृष्ठ काम करणारे पर्यवेक्षक,बी.एल.ओ. व कर्मचारी यांचा गुणगौरव करून सत्कार करण्यात […]

Breaking News

Archives

Categories

Meta