बालक – बालिका प्रतियोगिता व हळदीकुंकु कार्यक्रम थाटात  *भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाड़ी व कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम

*बालक – बालिका प्रतियोगिता व हळदीकुंकु कार्यक्रम थाटात 
*भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाड़ी व कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम

कन्हान – कन्हान शहरात भाजपा पारशिवनी तालुका महिला आघाड़ी व भाजपा कन्हान शहर महिला आघाड़ी यांच्या संयुक्त विद्यमाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पने तुन साकारित स्वस्थ बालक बालिका प्रतियोगिता व हळदीकुंकु कार्यक्रमाचे आयोजन दिवटे यांच्या निवासस्थानी करण्यात आले.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपा नागपुर जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा संध्याताई गोतमारे यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भाजपा नागपुर जिल्हा वैद्यकीय आघाडी अध्यक्षा प्रितीताई मानमोळे, जिल्हा महामंत्री प्रतिभा गवळी, शुभांगी गायधने यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमात उपस्थित बालक बालिकांची लुट करण्यात आली. महिला मान्यवरांच्या हस्ते महिलांना वान वाटप करुन स्वस्थ बालक बालिका प्रतियोगिता व हळदीकुंकु कार्यक्रम थाटात पार पाडला.

या प्रसंगी भाजपा नागपुर जिल्हा महिला आघाडी उपाध्यक्ष स्वाती पाठक, शालीनी बर्बे, मंत्री पौर्णिमा दुबे , भाजपा महिला आघाड़ी पारशिवनी तालुका अध्यक्ष सरिता लसुंते, कांद्री ग्रामपंचायत सदस्या अरुणा हजारे , सावित्री ठाकरे, टेकाडी ग्रामपंचायत सदस्या सिंधुताई सातपैसे, सुरेखा कांबळे, सुधा सेलोकर, शालीनी कंगाले , यादव ताई सह आदी महिला मोठ्या संख्येत होत्या.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता भाजपा कन्हान शहर महिला आघाड़ी अध्यक्ष तुलेषा नानवटकर, महामंत्री सुषमा मस्के, कन्हान – पिपरी नगरपरिषद नगरसेविका संगीता खोब्रागडे, सुषमा चोपकर, अनिता पाटील,

 वंदना कुरडकर, वर्षा लोंढे, सुनंदा दिवटे, मीना कळंबे , वैशाली शेंदरे, प्रतिक्षा चवरे , सह आदीनी सहकार्य केले .

कार्यक्रमाचे सुत्र संचालन संगीता खोब्रागडे  तर आभार शालीनी बर्बे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कन्हान नगरपरिषद येथील क लिपीक रवि वासे यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार

Thu Feb 3 , 2022
कन्हान नगरपरिषद येथील क लिपीक रवि वासे यांच्या सेवानिवृत्तीपर सत्कार कन्हान : – नगरपरिषद येथील नगर रचना विभागातील कनिष्ठ लिपिक श्री रवि वासे हे सेवानिवृत्त झाल्याने नप अधिका-यानी, नगसेविकांनी व कर्मचाऱ्यांनी रवि वासे यांचे सेवानिवृत्तीपर त्याना पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन सत्कार करित पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या. कन्हान ग्राम […]

Breaking News

Archives

Categories

Meta