शिक्षण विभागातील रिक्त पदे शिक्षकांमधून पदोन्नतीने भरा : धनराज बोडे

*शिक्षण विभागातील रिक्त पदे शिक्षकांमधून पदोन्नतीने भरा*

*अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे निवेदन*:धनराज बोडे

*कन्हान* शिक्षण विस्तार अधिकारी ,केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व पदवीधर विषय शिक्षकाची रिक्त पदे भरण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष धनराज बोडे व सरचिटणीस विरेंद्र वाघमारे यांनी एका निवेदनाद्वारे केली.
सध्यास्थितीत नागपूर जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विभागाचा कारभार प्रभारीच्या भरवशावर चालत आहे.सध्यास्थितीत जिल्हा परिषदमध्ये 11 शिक्षण विस्तार अधिकारी, 103 केंद्रप्रमुख, 15 उच्चश्रेणी मुख्याध्यापक व 102 पदवीधर विषय शिक्षकाची पदे गेल्या अनेक दिवसापासून रिक्त आहेत.सेवानिवृत्तीमुळे आणि पदोन्नती प्रक्रिया राबविण्यात न आल्यामुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होत गेली.गेल्या दोन महिन्यापूर्वी ही पदे भरण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेने सुरू केली,त्याबाबत पत्र काढून गटशिक्षणाधिका-यांकडून रिक्त पदाची माहिती मागविण्यात आली,शिक्षकांकडून विकल्प घेण्यात आले परंतू पुढे मात्र ही पदोन्नती प्रक्रिया जैसे थे राहीली.नुकतेच 11 /5/2021 ला पदावनत झालेल्या मुख्याध्यापकामधून उच्च श्रेणी मुख्याध्यापकाचे रिक्त पदावर झूम सभेच्या माध्यमातून समुपदेशनाद्वारे 27 पदे भरण्यात आली याच वेळेस उर्वरित 15 पदे पात्र सेवाज्येष्ठ शिक्षकांमधून भरणे अपेक्षित होते परंतू तसे न केल्यामुळे मुख्याध्यापकाची सुद्धा 15 पदे पून्हा रिक्तच राहीली.
सदर्हु रिक्त पदे पदोन्नतीद्वारे झूम सभेच्या माध्यमातून समुपदेशनाद्वारे भरण्याची मागणी गोपालराव चरडे ,रामु गोतमारे,सुनिल पेटकर, सुभाष गायधने,ज्ञानेश्वर वंजारी,जिल्हा अध्यक्ष धनराज बोडे,सरचिटणीस विरेंद्र वाघमारे आनंद गिरडकर गजेंद्र कोल्हे,अशोक बावनकुळे,पंजाब राठोड, लोकेश सुर्यवंशी,दिलीप जिभकाटे,अशोक डोंगरे,उज्वल रोकडे,रूपेश भोयर, राजेश चंदनखेडे,प्रेमचंद राठोड,महेंद्र साव,जगदिश पीत्तूले,धरमसिंग राठोड,अशोक ठाकरे,रामेश्वर थोटे,युवक चर्जन,नागेश बोगाडे,भारत माहुरे,अशोक मानकर,धर्मेश रोकडे आदिंनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

तेजस संस्था व्दारे कन्हान व सत्रापुर ला गरजु ना  अन्नदान केले.

Fri May 14 , 2021
तेजस संस्था व्दारे कन्हान व सत्रापुर ला गरजु ना  अन्नदान केले.  #)  तेजस बहुउद्देशीय संस्था कामठी चा सेवाभावी कौतुकास्पद उपक्रम.  कन्हान : – तेजस संस्था कामठी व्दारे परिसरातील दात्या कडुन गहु, तांदुळ गोळा करून अंपग, गरिब, निराधार गरजु लोकांना अन्नधान्य दान या उपक्रमां तर्गत कन्हान व सत्रापुर येथील अंत्यत गरजु लोकांना […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta