कन्हान नगर परिषद येथे सहाय्यक आयुक्त महिला अधिकारी यांच्या हमल्याचा जाहिर निषेध

*कन्हान नगर परिषद येथे सहाय्यक आयुक्त महिला अधिकारी यांच्या हमल्याचा जाहिर निषेध*

हल्लाखोरां वर कठोर कारवाई करण्याची मागणी

कन्हान – ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व त्यांचे अंगरक्षक यांच्या वर जीवघेण्या हल्ला झाल्याने कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे प्रशासकीय अधिकारी यांनी महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटना व स्वतंत्र म्युनिसिपल कामगार यूनियन द्वारे या जीवघेण्या हल्ल्याचा निषेधार्थ काळी फित बांधुन काम बंद आंदोलन करुन व नगर परिषद मुख्याधिकारी मार्फत शासना ला एक निवेदन पाठवुन तात्काळ हल्लाखोरां वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे .
सोमवार दिनांक ३० आॅगस्ट २०२१ ला ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व त्यांचे अंगरक्षक हे सायंकाळी ५:३० वाजता च्या सुमारास अतिक्रमण विरोधी पथक घेऊन अनाधिकृत हातगाड्यां वर कारवाई करत असतांना तेथील गुन्हेगारी प्रवृत्तीचे हातगाडे फेरीवाले अमरजीत यादव यांनी
सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे व त्यांचे अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्या वर तीक्ष्ण हत्यारा ने जीवघेणा हल्ला करुन या दोघांनाही गंभीर दुखापत केली असुन या हल्ल्यात सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या डाव्या हाताची दोन बोटे पुर्णपणे तुटुन रस्त्यावर पडली व उजव्या हाताला अंगठ्यासह गंभीर दुखापत झाली असुन त्यांच्या डोक्यावर खोल मार लागला आहे तसेच सहाय्यक आयुक्त श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या अंगरक्षक सोमनाथ पालवे यांच्या डाव्या हाताचे एक बोट पुर्णपणे तुटुन पडल्याने या दोघांनाही प्रथमता वेदांत रुग्णालय ठाणे येथे नेण्यात आले असुन गंभीर दुखापत व जीवाला असलेला धोका विचारात घेऊन दोघांनाही तात्काळ ज्युपिटर हाॅस्पिटल ठाणे येथे दाखल करण्यात आले असुन श्रीमती कल्पिता पिंपळे यांच्या वर एकुण तीन शस्त्रक्रिया करण्यात आले असुन या मध्ये त्यांची तुटलेली दोन्ही बोटे जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला असुन त्यांचा अंगरक्षक सोमनाथ पालवे यांचे तुटलेले बोट रात्री उशिरा १२:०० वाजे पर्यंत शोध घेऊ नही सापडले नसल्याने त्यांच्या तुटलेल्या बोटांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असुन झालेला प्रकार अतिशय गंभीर असुन निंदनीय आहे . एका महिला अधिकाऱ्यांवर अश्या प्रकारचा हल्ला होणे ही नक्कीच चिंताजनक बाब असल्याने कन्हान – पिपरी नगरपरिषद येथे सर्व प्रशासकीय अधिकारी यांनी
महाराष्ट्र राज्य नगर परिषद संवर्ग अधिकारी संघटन व स्वतंत्र म्युनिसिपल कामगार यूनियन द्वारे या जीवघेण्या हल्ल्याचा निषेधार्थ काळी फित बांधुन काम बंद आंदोलन करुन व नगर परिषद मुख्याधिकारी मार्फत शासना ला एक निवेदन पाठवुन तात्काळ या जीवघेण्या हल्लाखोरां वर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे .
या प्रसंगी कन्हान – पिपरी नगरपरिषद कार्यालय अधीक्षक सुशांत नरहरे , लेखापाल पंकज खवसे , पाणी पुरवठा फिरोज बिसेन , रवी धोटे , मोहनसिंह यादव , लकेश माहतो , नेहाल बढेल , रवि ठाकुर , रवि वासे सह आदि नप कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ट्रक व मोटार सायकल अपघातात एक गंभीर जख्मी

Fri Sep 3 , 2021
ट्रक व मोटार सायकल अपघातात एक गंभीर जख्मी कन्हान ता.01 कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी शिवारात ट्रक चालकाने आपले ट्रक विरूद्ध मार्गाने आणुन मोटार सायकल ला धकड मारुन जख्मी केले. प्राप्त माहिती नुसार रविवार ( दि 29) सायंकाळी 6 वाजता दरम्यान फिर्यादी संजय वसंतराव कोलते वय 53 रा.हनुमान नगर कन्हान […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta