ट्रक व मोटार सायकल अपघातात एक गंभीर जख्मी

ट्रक व मोटार सायकल अपघातात एक गंभीर जख्मी

कन्हान ता.01 कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत डुमरी शिवारात ट्रक चालकाने आपले ट्रक विरूद्ध मार्गाने आणुन मोटार सायकल ला धकड मारुन जख्मी केले.


प्राप्त माहिती नुसार रविवार ( दि 29) सायंकाळी 6 वाजता दरम्यान फिर्यादी संजय वसंतराव कोलते वय 53 रा.हनुमान नगर कन्हान रहिवासी पारशिवनी येथुन काम आटोपुन कन्हान येथे आपले मोटार सायकल क्रमांक एम एच 40 बी.डी. 1979 नी येत असतांना डुमरी शिवारातील पेट्रोल पंपा जवळील राईस मिलच्या समोर समोरुन ट्रक क्रमांक एम एच 40 बी.जी. 9359 च्या ट्रक चालकाने आपले ट्रक विरूद्ध दिशेने येऊन फिर्यादी संजय वसंतराव कोलते यांच्या मोटार सायकल ला धकड मारुन जख्मी केले. यात त्यांच्या डावा पाय फ्रैक्चर झाले सोबत पाठीला डाव्या खंद्यावर व डोक्याला डाव्या बाजुला मार लागुन जख्मी केले. यावेळी ट्रक चालकाने संधी साधत घटनास्थळा वरुन पळ काढला. फिर्यादी संजय वसंतराव कोलते यांच्या तोंडी रिपोर्ट व वैद्यकीय अहवाला वरुन कन्हान पोलीसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी खुशाल रामटेके करीत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सिहोरा येथील रहिवासी कुमारी प्राची नन्नावरे ज्युनियर सेंन्ट्रल इंडिया २०२१ मध्ये प्रथम

Fri Sep 3 , 2021
*सिहोरा येथील रहिवासी कुमारी प्राची नन्नावरे ज्युनियर सेंन्ट्रल इंडिया २०२१ मध्ये प्रथम* #) कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी केला सत्कार   कन्हान – नागपुर येथे सिनेस्टेप द्वारा आयोजित ‘ज्युनिअर सेंन्ट्रल इंडिया फॅशन शो २०२१’ मध्ये कन्हान परिसरात असलेल्या सिहोरा गावातील रहिवासी कुमारी प्राची नन्नावरे ही प्रथम आल्याने कन्हान शहर […]

You May Like

Archives

Categories

Meta