कामठी येथे  विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळाव्याचे आयोजन

कामठी येथे  विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार मेळाव्याचे आयोजन

शाहीर मेळावा व गुरुपुजेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती

 

कन्हान ता.२६

   शाहीर मंडळ ऑल इंडिया भारतीय क. शाहीर ड. मंडळ, कामठी (अंतर्गत ) भव्य विदर्भ स्तरीय शाहीर कलाकार शाहीर कलाकार मेळावा आणि गुरुपूजा श्रीराम जानकी मंगल कार्यालय, राम मंदिर, मच्छीपूल, कामठी जि. नागपूर दरवर्षीप्रमाणे यावर्षी दिनांक ४ जुलै २०२३ मंगळवार रोजी वेळ सकाळी ९ ते ७ पर्यंत लोकशाहीर वस्ताद स्व.भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ गुरुपुजा आणि भव्य विदर्भस्तरीय शाहीर कलाकार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे.

    कार्यक्रमाचे उद्घाटक देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री, पालकमंत्री नागपूर जिल्हा, कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष भाजपा महाराष्ट्र प्रदेश तथा आमदार वि. प. सदस्य, प्रमुख अतिथी खासदार कृपालजी तुमाने रामटेक लोकसभा क्षेत्र, प्रमुख अतिथी राजेंद्र मुळक माजी मंत्री, जिल्हा अध्यक्ष काँग्रेस कमिटी, चंद्रपाल चौकसे पर्यटक मित्र, रामटेक उपस्थित राहतील.

     कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आ.टेकचंद सावरकर, सुलेखाताई कुंभारे, देवराव रडके, डॉ. बबनराव तायवडे, प्रा.ज्ञानेश्वर वाकुडकर, डॉ.संजय बजाज, डॉ. राजीव पोतदार, विजय हटवार, दादासाहेब वलथरे, कवी ज्ञानेश्वर वांढरे , डॉ. अशोक बागुल, राजेश काकडे, अजय अग्रवाल, अरविंद गजभिये, प्रकाश जाधव माजी खासदार, संपादक सा. विदर्भपथ राजू भाऊ हिंदुस्थानी, राजू चौधरी, अजय बोढारे, अनिल नियान उपस्थित राहतील.

   प्रसंगी विशेष सत्कार शाहीर कलाकार जिल्हा परिषद सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांचा सत्कार सोहळा, युवा शाहीर आर्यन अंबादास नागदेवे, युवा शाहीर सुरज ब्राह्म नवघरे, ज्येष्ठ शाहीर आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार (शाहीर कलाकार यांच्या परिवारातील दहावी आणि बारावी पास विद्यार्थी आणि उच्चशिक्षित विद्यार्थी यांचे सत्कार सोहळा ) आयोजन केले आहे. विशेष सहयोग ब्रम्ह नवघरे, विक्रम वांढरे, मनोहर वाघमारे, दशरथ महंग, चिरकुट पुडेकर मोरेश्वर बडवाईक विनायक नागमोटे, गजानन बडे, आदी ठाकरे, आनंदराव ठवरे, नरेश मोटघरे, राधेश्याम हटवार आदी मान्यवर उपस्थित राहतील. यावेळी ज्येष्ठ शाहीर, नामवंत कलाकार यांची प्रमुख कलाकारांचे सहकार्य राहील.

      कार्यक्रमाचे आयोजक शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया, जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र शाहीर परिषद नागपूर तसेच गणेश देशमुख, शाहीर राजेंद्र लक्षणे, अरुण मेश्राम, भगवान लांजेवार, भूपेंद्र बावनकुळे, प्रदीप कडबे, सुनील सरोदे यांनी शाहीर कलाकारांनी मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शाहु महाराजांच्या जयंती निमीत्त कौशल्य विकास प्रशिक्षण

Wed Jun 28 , 2023
शाहु महाराजांच्या जयंती निमीत्त कौशल्य विकास प्रशिक्षण कन्हान,ता.२७ जून      नगर परिषद कार्यालय मार्फत कौशल विकास केंद्र येथे डीजीटल कौशल विकास प्रशिक्षण सोमवार (ता.२६) जून रोजी समाजभवन, सार्वजनिक वाचनालय, हनुमान नगर, कन्हान येथे आयोजित करण्यात आले होते.     ‘ई’ लायब्ररीच्या इमारतीत कौशल्य विकास प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या […]

You May Like

Archives

Categories

Meta