गुरूपुजा, सत्कार व सांस्कृतिक लोककला सोहळा
विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान व्दारे आयोजन
कन्हान,ता.९ ऑगस्ट
भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय न्यु दिल्ली व विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती प्रित्यर्थ गुरुपुजा, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार व स्व.धर्मदासजी भिवगडे द्वितीय पुण्यतिथी कार्यक्रम लोककला सोहळयाचे कन्हान येथे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार (दि.१०) ऑगस्ट २०२३ ला सकाळी ९ ते सायं. ६ वाजता पर्यंत भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालय न्यु दिल्ली व विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान च्या संयुक्त विद्यमाने कुलदीप मंगल कार्यालय कन्हान येथे आयोजित केले. पांरपारिक लोककलेचा सर्वांगिण विकास तसेच नविन पिढीला जागृत करण्याच्या उद्देशाने विदर्भातील सर्व लोककलेच्या पथकांना मंच उपलब्ध करून पारंपारिक लोककलेचा प्रसार व प्रचार आणि जतन व्हावे. यास्तव सतत कार्यरत आणि शासनाच्या विविध योजना राबविणा-या विदर्भ शाहीर कलाकार परिषद कन्हान व्दारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती प्रित्यर्थ गुरूपुजा, सांस्कृतिक कार्यक्रम, सत्कार व द्वितीय पुण्यतिथी कार्यक्रम आमदार सुनिल केदार, माजी मंत्री यांचे अध्यक्षेत राजेंद्र मुळक माजी मंत्री, कॉग्रेस जिल्हाध्यक्ष नागपुर ग्रा.यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन सौ.मुक्ताताई कोकर्डे अध्यक्षा जि.प.नागपुर, चंदपाल चौकसे पर्यटन मित्र, सौ.रश्मीताई बबलु बर्वे, नरेश बर्वे, शंकरराव चहांदे, प्रमोद मकेश्वर ठाणेदार कन्हान आदिच्या प्रमुख उपस्थित संपन्न होणार आहे. कार्यक्रम सकाळी ९ ते १२ वाजता भंजन मडळांचे सादरीकरण, दुपारी १२ ते १ वाजता प्रमुख पाहुण्यांचे स्वागत, शाहिर कलावंताचे व पत्रकार बांधवांचा सत्कार, दुपारी १ ते ३ वाजता खडी गंमत व दंडार सादरीकरण, दुपारी ३ ते ६ वाजे पर्यंत किर्तन आणि इतर मंडळाचे सादरीकरण होईल. सहभागी सर्व मंडळास व कलावंतांना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्राने गौरविण्यात येईल. तसेच सहभागी होणाऱ्या मंडळांनी कलेचे नाव, कलावंताच्या नावाची यादी, मो. नंबर सह वेगळ्या कागदावर जमा करावे. भजनाच्या व्यतिरिक्त इतर कला नाटक, दंडार, गीत, नृत्य, किर्तन, भारूड आदी कला सादर करण्या-या मंडळांचा विशेष सत्कार करण्यात येईल. करिता शाहिर, लोक कलावंतानी मोठया संख्येने कार्यक्रमास उपस्थित राहुन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन विदर्भ शाहिर कलाकार परिषद अध्यक्ष मनिष धर्मदास भिवगडे यांनी केले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्विते करीता कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे, शाहीर दयाल कांबळे, शा.रामेश्वर दंडारे, शा.चुडमन लांजेवार, शा.उत्तम आशिर्वाद, शा.हिम्मतराव यावलकर, शा.राम कृष्ण कानोलकर, शा.वसंता कुंभरे, शा.गंगाधर निंबोने, शा.मनोहर धनगरे, शा.मानेराव गुरुजी, शा.ज्ञानेश्वर तायवाडे, शा. केशव नारनवरे, शा. राजकुमार गायकवाड, शा. हरिश्चंद्र कार्लेकर, महिला प्रतिनिधी सौ. ज्योतीताई वाघाये, सौ विद्या लंगडे सह विदर्भ शाहीर कलाकार परिषदेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहे.
Post Views: 621
Wed Aug 9 , 2023
न्यू गुजरखेडी येथील वेलकम लॉजवर धाड अनैतीक संबंध प्रस्थापीत करून वेश्या व्यवसाय करण्यास केले प्रवृत्त; तीन आरोपींस अटक एक फरार वेश्या व्यवसायासाठी ठाण्याहून आणल्या महीला ; सावनेर पोलिसांची कारवाई सावनेर पुढील 10 दिवसास वेश्या व्यवसाय करण्यासाठी ठाणे शहरातून सावनेर जवळील न्यू गुजरखेडी येथील वेलकम लॉजवर आण्यात आलेल्या दोन महीलांसह चार […]