ग्रा.पं.कान्द्री येथे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

ग्रा.पं.कान्द्री येथे लोकार्पण सोहळा थाटात संपन्न

तीन कचरा गाडी, एक ट्रॅक्टर, एक पाणी टँकर व स्वर्गरथाचे लोकार्पण.  

 

कन्हान : – १४ व्या वित्त आयोग निधी अंतर्गत ग्रा पं कान्द्री व्दारे ग्रामस्थाच्या सेवेकरिता तीन कचरा गाडी, एक ट्रॅक्टर, एक पाणी टँकर व स्वर्गरथ विकत आणुन या सर्व गाड्यांची विधिवत पुजा अर्चना करून मान्यव रांनी हिरवी झेंडी दाखवुन लोकार्पण सोहळा थाटात साजरा करण्यात आला.

ग्रा.पं. कान्द्री येथे गावकऱ्यांच्या सेवेसाठी १४ वा वित्त आयोग निधी अंतर्गत तीन कचरा गाडी, एक ट्रॅक्टर, एक पाणी टँकर व स्वर्गरथ विकत आणुन या सर्व गाड्यांची विधिवत पुजा अर्चना सौ. रश्मीताई बर्वे अध्यक्षा जि. प.नागपुर श्री. बलवंतजी पडोळे सरपंच ग्रा. पं. कान्द्री, सौ मिनाताई कावळे सभापती पं स पारशिवनी यांच्या शुभहस्ते हिरवी झेंडी दाखवुन गाव कऱ्यांचा सेवेकरिता लोकार्पण करित सर्व गाड्या सुरू करण्यात आल्या. याप्रसंगी श्यामकुमार बर्वे उपसरपं च , ग्रा.पं. सदस्य धनराज कारेमोरे, बैसाखु जनबंधु, प्रकाश चाफले, शिवाजी चकोले, चंद्रशेखर बावनकुळे, महेश झोडावणे, राहुल टेकाम ग्रा.पं. सदस्या आशाता ई कनोजे, दुर्गाताई सरोदे, सिंधुताई वाघ मारे, रेखाताई शिंगणे, अरूणा हजारे, विभा पोटभरे, मोनाली वरले, वर्षा खडसे, अरूणा पोहरकर, ग्राम विकास अधिकारी दिनकर इंगळे तसेच ग्रा.पं चे समस्त कर्मचारी वृंद व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

संत नगाजी नगर येथे वृक्षरोपण थाटात  संपन्न

Mon Jul 4 , 2022
संत नगाजी नगर येथे वृक्षरोपण थाटात  संपन्न               कन्हान ता.4 जुलै वृक्षलागवड हा निवळ एक सरकारी उपक्रम न राहता ही एक लोकचळवळ व्हावी, नाभिक एकता मंच पारशिवणी तालुक्याचा वतीने श्री.संत नगाजी नगर कांन्द्री येथील आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात नाभिक समाजाच्या समाज बांधवांनी उस्फूर्त सहभाग घेतला. […]

You May Like

Archives

Categories

Meta