शिवशक्ती डहाका मंडळ तर्फे शाहिर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार

शिवशक्ती डहाका मंडळ तर्फे शाहिर राजेंद्र बावनकुळे यांचा सत्कार

कन्हान, ता.17

      शिवशक्ती डहाका मंडळ कांन्द्री तर्फे जय संताजी नाऱ्याचे जनक, लोकशाहीर वस्ताद स्व.भीमराव बावनकुळे गुरुजी यांच्या समृर्ती प्रित्यर्थ डहाका मंडळा वतीने गुरुपुजा कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच कोल माईन्स रोड, हनुमान मंदिर कांन्द्री -कन्हान येथे गुरुपुजा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गुरूपुजा कार्यक्रमाचे उद्घाटन शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे, आकाशवाणी, कॅसेट सिंगर यांच्या हस्ते व कांन्द्री ग्रामपंचायत सरपंच बलवंत पडोळे, उपसरपंच बबलु बर्वे यांच्या उपस्थिती मध्ये विधीवत पुजा अर्चना करून पार पडला.यावेळी शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे,अध्यक्ष भारतीय कलंगि शाहिर मंडळ यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात पाहुण्याचे स्वागत सत्कार करण्यात आला असुन मंदिरात भजन, कीर्तन व डहाका प्रस्तुत करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी आयोजकांनी सर्वांचे आभार व्यक्त करुन गुरुपुजा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी बंटी आकरे, छोटु सिंग, शिवाजी चकोले, कवडु आकरे, झिबल सरोदे, एकनाथ सरोदे, वासुदेव आकरे, रामा हिवरकर, उषा वंजारी, वंदना घुमडे, उषा वाडीभस्मे, इंदु टेमरे, सुनिल सरोदे, मधुकर कामडे, फजित बावने सह आदि नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता वामन देशमुख, प्रवीण आकरे, मनोज, अशोक किरपान, राजेश पोटभरे, विजय आकरे, विक्रम वांढरे, ब्रम्हा नवघरे, चरडे,भोजराज वासाडे, शालीकराम शेंडे, गिरधर बावने, नितेश वांढरे सह आदि नागरिक  सहकार्य केले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रामकृष्ण मठ नागपुर व्दारे गरजु विद्यार्थ्याना गणवेश वाटप 

Mon Jul 18 , 2022
रामकृष्ण मठ नागपुर व्दारे गरजु विद्यार्थ्याना गणवेश वाटप आदर्श हायस्कुल येथे गणवेश वितरण कन्हान, ता. 18      आर्दश हायस्कुल कन्हान येथे रामकृष्ण मठ धंतोली नागपुर यांच्या वतीने शाळेच्या गरिब, गरजु व होतकरू विद्यार्थांना गणवेश वितरण करण्यात आले. सोमवार (दि.१८) जुलै ला आदर्श हायस्कुल कन्हान येथे रामकृष्ण मठ धंतोली नागपुर […]

You May Like

Archives

Categories

Meta