विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक, शाखा अभियंत्यांचे नियुक्ती आदेश 14 ऑक्टोबरपर्यंत न निघाल्यास 15 पासून आंदोलन : बावनकुळे

विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक, शाखा अभियंत्यांचे
नियुक्ती आदेश 14 ऑक्टोबरपर्यंत न
निघाल्यास 15 पासून आंदोलन : बावनकुळे

कामठी : 30 सप्टेंबर
महावितरणमध्ये पाच हजार विद्युत सहायक, दोन हजार उपकेंद्र सहायक व 400 शाखा अभियंता अभियंत्यांच्या नियुक्तीचे आदेश येत्या 14 ऑक्टोबरपर्यंत महावितरण प्रशासनाने काढावे. अन्यथा 15 ऑक्टोबरला नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपाचे प्रदेश महासचिव व माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बानकुळे यांनी दिला आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासन काळात आयटीआय अर्हता धारक व आयटीआय अप्रेंटिशिप धारक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने महावितरण कंपनीअंतर्गत अनुक्रमे 5 हजार विद्युत सहायक, 2 हजार उपकेंद्र सहायक तसेच 400 शाखा अभियंता यांना नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार अर्ज करणे, आवश्यक त्या पदाची परीक्षा घेणे या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. फक्त संबंधित अर्जदारांची कागदपत्रे पडताळणी करून नियुक्ती करणे शिल्लक आहे. असे असताना या अर्जदारांना अजूनपर्यंत महावितरणने नियुक्ती दिली नाही.
विद्युत सहायक, उपकेंद्र सहायक तसेच शाखा अभियंता यांच्या नियुक्तीचे आदेश 14 ऑक्टोबरपर्यंत काढण्यात आले नाही तर 15 ऑक्टोबर रोजी महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी महावितरणच्या व्यवस्थापकीय संचालकांना पाठविण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

नयाकुंड शिवारात बिबट्याच्या मृत्यू : मृत्यू नेमका कसा पेंच कायम ?

Thu Oct 1 , 2020
नयाकुंड शिवारात बिबट्याच्या मृत्यू , सहा माहिन्यात दुसरी घटना ,.बिबट्याचा मृत्यू नेमका कसा पेंच कायम ? कमलसिह यादव पाराशिवनी तालुका प्रतिनिधी पाराशिवनी(ता प्र) : तालुक्यातील नयाकुंड शिवारात राहुल वासुदेव वासानीक यांचे शेत सर्वे क्रमांक ५५७ मध्ये तुरी झाड़ाची ची शेडा खुळणा करिता राहुल वासनिक व पात्नी प्रतिभा राहुल वासानीक हे […]

You May Like

Archives

Categories

Meta