पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट प्रक्षेपण कार्यक्रमाने शेतक-यांना मार्गदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट प्रक्षेपण कार्यक्रमाने शेतक-यांना मार्गदर्शन

कन्हान,ता.२८ जुलै

    कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड नागपूर झोन व्दारे सौरभ कृषी सेवा केंद्र, तारसा रोड, कन्हान येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे थेट प्रक्षेपण (ऑनलाईन) कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून शेतकऱ्यांना शेती विषयक मार्गदर्शन करण्यात आले.

   पंतप्रधान महोदय यांच्या शुभहस्ते गुरुवार (दि.२७) जुलै सकाळी ११ वाजता राजस्थान येथील सिकर येथे किसान सन्मान निधी संमेलनात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्ताचे राशी थेट शेतकऱ्यांचा बँक खात्या मध्ये जमा केली. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण (ऑनलाईन) कोरोमंडल इंटरनॅशनल लि. नागपूर झोन मधील सौरभ कृषी सेवा केंद्र, कन्हान येथे पंतप्रधानांचा थेट प्रक्षेपण (ऑनलाईन) कार्यक्रमास जिल्हा कृषी अधिक्षक रवींद्र मनोहरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

   प्रसंगी त्यांनी शेतकरी बांधवांना कृषी विभागाचा विविध योजनेची माहिती दिली. कंपनी सहाय्यक महाव्यवस्थापक बी.बी.पांडा सर यांनी मेळाव्याला संबोधित करित नॅनो डीए पी, ग्रोप्लस प्रो मॅग्नेशियम, अक्यूस्प्रे रेंज आणि सेंद्रिय श्रेणी या सारख्या उत्पादनांसह कोरोमंडलच्या नाविन्य पूर्णकृषी उपायांबद्दल व कंपनीच्या सेवा जसे ड्रोन, न्यूट्री-क्लिनिक, मोफत माती परीक्षण आणि सल्लागार आदी कंपनीचा शेतकरी केंद्रित दृष्टीकोन व गुणवत्ता फोकस, चिरस्थायी इतिहासा स्पष्ट केले. यावेळी वेंकटेश कारेमोरे जि.प.सदस्य, चेतन कुंभलकर उपसरपंच खंडाळा (घ), गुंडेराव भुते उपसरपंच नीलज, कमलेश भोयर कन्हान ऍग्रो व्हिजन, संजय सत्येकार, अतुल हजारे, अभिजित फरसोले, राजेन्द्र बंड, दिलीप हटवार, नितेश हटवार, प्रफुल नागपुरे कृषी मित्र खंडाळा, धनराज चकोले सदस्य निलज, सूरज चकोले, डोमा चकोले आदीसह कंपनीचे अधिकारी, टीएमएम अमित जैन, उपव्यवस्थापक विजय सोनटक्के, कृषी शास्त्रज्ञ माणिक सिंगारे, न्यूट्री-क्लिनिकचे प्रभारी किरण मस्के, कन्हान पीएमकेएसके चे प्रो प्रा.दीपक गडे आणि १०५ एचएनआय प्रगतशील शेतकरी उपस्थित होते. सूरज शेंडे तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकरी बांधवाना कृषी विभागा मार्फत तालुक्यात राबविण्यात येणाऱ्या कृषी विभागाचा विविध उपक्रमा बाबत माहिती दिली. कृषि सहायक विवेकानंद शिंदे यांनी उपस्थित मान्यवर व शेतकरी बांधव यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ऑटो चालक व वन्यप्राणी, निसर्ग संरक्षक सदस्यांना ५२ प्रथोमचार साहित्य किट वाटप  शिवसेना (उबाठा) कन्हान व्दारे उध्दव ठाकरे यांच्या जन्मदिनी सेवाभावी उपक्रम 

Sat Jul 29 , 2023
ऑटो चालक व वन्यप्राणी, निसर्ग संरक्षक सदस्यांना ५२ प्रथोमचार साहित्य किट वाटप शिवसेना (उबाठा) कन्हान व्दारे उध्दव ठाकरे यांच्या जन्मदिनी सेवाभावी उपक्रम कन्हान,ता.२८ जुलै    शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे कन्हान व्दारे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या जन्मदिनी तारसा रोड चौक, कन्हान येथे माजी खासदार प्रकाश जाधव यांच्या हस्ते ऑटो चालकांना […]

You May Like

Archives

Categories

Meta