जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक

जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या आरोपीला अटक पो.स्टे .

सावनेर : – अंतर्गत 12 कि.मी. अंतरावरील पाटणसावंगी खापा टी पॉईंट सावनेर येथे दिनांक 26/12/2021 चे 16.50 वा . ते 17.50 वा . दरम्यान सावनेर पोलीस पथक पेट्रोलींग करीत असतांना त्यांना गुप्त माहिती मिळाली की , काही इसम विनापरवाना व अवैधरीत्या जनावरांना निर्दयतेने कोंबुन वाहतुक करीत आहे . अशा मिळालेल्या गुप्त माहिती वरुन सावनेर पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी जावून नाकाबंदी करुन एम . एच . – 40 / एन 2420 क्रमांकाच्या बोलेरो मॅक्स पिकअप गाडीला थांबवुन तपासले असता सदर वाहनात आरोपी नामे – अजय शालीकराम बोहरे , वय 21 वर्ष , रा . लौणखैरी ता . कामठी याच्या ताब्यातुन 8 ( बैले ) कि . 68,000 / – रू . चे जनावरे निर्दयतेने वाहतुक करतांना मिळुन आले . वाहनासह एकुण किंमती 3,50,000 / – रु . चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे . सदर प्रकरणी सरकार तर्फे पोलीस शिपाई हेमराज कोल्हे , पो.स्टे . सावनेर यांचे रिपोर्टवरून पो.स्टे . सावनेर येथे वरील आरोपीविरुध्द कलम 11 ( 1 ) ( अ ( ड ) प्राणि निर्दयतेने वागणुक प्रतिबंधक कायदा , 5 ( अ ) ( ब ) , 9 , 130 ( 1 ) , 83,177 महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम काद्ययान्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे . यातील आरोपीला अटक करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास पोलीस हवालदार संदीप नागरे हे करीत आहे .

  सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार मगर , अपर पोलीस अधीक्षक श्री . राहुल माकणीकर , उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर विभाग श्री . अशोक सरंबळकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन सावनेरचे ठाणेदार पोलीस निरीक्षक श्री . मारुती मुळूक यांचे नेतृत्वात सपोनि श्री फुलेकर , पोलीस हवालदार संदीप नागरे , पोलीस शिपाई हेमराज कोल्हे व भुपेश तभाने यांनी यशस्वीरित्या पार पाडली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

अपघातात पंचवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू

Tue Dec 28 , 2021
अपघातात मृत्यू २५ वर्षीय तरूणाचा मृत्यू   उमरेड : – अंतर्गत 02 कि.मी. अंतरावरील मौजा गिरड रोड सोयाबिन कंपनी जवळ धुरखेडा येथे दिनांक 25 / 12 / 2021 चे 19:30 वा . ते 20.00 वा . दरम्यान एम . एच . 40 / बीजी 4761 क्रमांकाच्या ट्रकचा चालक आरोपी नामे- राजकुमार […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta