दुकानात येऊन वाद करणा-यास चाकुने मारून केले जख्मी

दुकानात येऊन वाद करणा-यास चाकुने मारून केले जख्मी

कन्हान,ता.२३ ऑगस्ट

    शहरातील अशोक नगर येथे नाटकर पान पॅलेस येथे वाद करणा-या युवकाला चाकुने मारून गंभीर जख्मी केल्याने फिर्यादी च्या तक्रारीने कन्हान पोलीस स्टेशन ला दोन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करित एकास अटक करून पुढील तपास पोलीस करित दुस-या आरोपी चा शोध घेत आहे.

    पोलिसांच्या माहिती नुसार, सहा सात दिवसा पुर्वी गौरव उर्फ तेनाली संतोष राऊत (वय १७) रा.अशोक नगर कन्हान याचा नाटकर पान पॅलेस समोर आरोपी मोनिष ऊर्फ अक्षय प्रभाकर नाटकर, आकाश प्रभा कर नाटकर यांचाशी खर्रा व सिगरेट घेण्याचा कारणा वरुन वाद झाला होता. तेव्हा प्रशांत बबन सारवे (वय १९) रा. अशोक नगर कन्हान याने मध्यस्ती करुन वाद सोडविला होता. बुधवार (दि.२३) ला रात्री ९ ते ९.३० वाजता दरम्यान प्रशांत सारवे, तेनाली राऊत, सागर टेटे हे तिघे सागर च्या दुचाकीने आंबेडकर चौक कडुन अशोक नगर कडे जात असतांना सागर टेटे याने प्रशांत सारवे, तेनाली राऊत यांना नाटकर च्या घरा जवळ रोडवर उतरविले व सागर टेटे हा आपल्या वाह नाने घराकडे निघुन गेला. तेव्हा प्रशांत सारवे व तेनाली राऊत हे आपल्या घरी पायदळ जात असतांना मोनीष नाटकर यांनी तेनाली राऊत ला आवाज दिला व जवळ बोलावुन त्या दिवशी तु मला काय बोलत होता. आता सांग तुला काय करायचे आहे ? या वरून तेना ली याने मोनीष ला शिव्या दिल्याने दोघांचे झगडा भांडण झाले झगडयाचा आवाज ऐकुण आकाश सुध्दा घराबाहेर आला व दोघेही भावांनी तेनाली ला हातबुक्यांनी मारू लागले तेव्हा प्रशांत ने मध्यस्ती करून त्यांना एकमेकापासुन दुर केले. तेवढ्यातच मोनीष ऊर्फ अक्षय याने दुकानातुन चाकु आणुन तेनाली च्या डाव्या हाताच्या खांद्यावर व कमरेवर चाकुने सपासप वार करुन गंभीर जख्मी केले. सदर घटनेची माहिती कन्हान पोलीसांना मिळताच उपवि भागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर, पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते, सहायक पोलीस निरीक्षक राजेश जोशी, महेश बिसेन ‌यांनी घटनास्थळी पोहचुन पंचनामा करुन जख्मी युवकाला प्राथमिक आरोग्य केंन्द्र कन्हान येथे नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासुन प्रथम उपचार करुन तेनाली ला मेडीकल हाॅस्पीटल नागपुर ला रेफर केल्याने मेडीकल हॉस्पीट ल नागपुर येथे उपचार सुरु आहे.लसदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी प्रशांत सारवे यांचे तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी मोनिष ऊर्फ अक्षय नाटकर, आकाश नाटकर यांचे विरुद्ध अप क्र. ५४१/२३ कलम ३०७, ५०४, ३४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करुन आकाश नाटकर याला अटक करुन उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक भटकर, पोलीस निरिक्षक सार्थक नेहेते यांचा मार्गदर्शनात सहायक पोलीस निरिक्षक राजेश जोशी, महेश बिसेन हे पुढील तपास करित असुन दुस-या आरोपीचा शोध घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

ग्रोमर वेंचर्स मुद्यावरुन कन्हान नगर परिषदेच्या सभेत गोंधळ मुलभुत सुविधा करिता जागेचा उपयोग करा- स्थानिकांची मागणी

Sat Aug 26 , 2023
ग्रोमर वेंचर्स मुद्यावरुन कन्हान नगर परिषदेच्या सभेत गोंधळ मुलभुत सुविधा करिता जागेचा उपयोग करा- स्थानिकांची मागणी  कन्हान,ता.२५ ऑगस्ट      कन्हान-पिपरी नगरपरिषद मध्ये शुक्रवार रोजी झालेल्या विशेष सभेत ग्रोमर वेंचर्स मुद्यावरुन चांगलाच गोंधळ झाल्याची चर्चा असुन शहरातील मुलभुत सुविधा करिता हिंदुस्तान लिवर कंपनीच्या जागेचा उपयोग करावा अशी मागणी स्थानिकांनी न.प.प्रशासनाला […]

You May Like

Archives

Categories

Meta