केरडी येथे कुस्त्यांचा जंगी आमदंगल संपन्न माजी मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते कुस्तीचा शुभारंभ व बक्षीस वितरण 

केरडी येथे कुस्त्यांचा जंगी आमदंगल संपन्न

माजी मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते कुस्तीचा शुभारंभ व बक्षीस वितरण 

कन्हान, ता.१७ जानेवारी 

    जय बजरंग व्यायाम शाळा केरडी व्दारे जंगी कुस्त्यांचा आमदंगल माजी मंत्री सुनिल केदार यांच्या प्रमुख उपस्थित दरवर्षी नुसार या वर्षी सुध्दा जय बजरंग व्यायाम शाळा, केरडी व गावकऱ्यां तर्फे रविवार (दि.१४) जानेवारी २०२४ जय बजरंग व्यायाम शाळा केरडी च्या प्रांगणात संपन्न झाला.

   कुस्त्यांचा जंगी आमदंगल व्यायाम मंडळाचे अध्यक्ष दयाराम भोयर यांचे अध्यक्षेत तर प्रमुख अतिथी माजी मंत्री सुनिल केदार यांच्या हस्ते आमदंगल कुस्त्यांची सुरूवात करण्यात आली.

    प्रसंगी माजी मंत्री राजेंद्र मुळक, विशाल बरबटे, सुखराम रच्छोरे, असोक चिखले, गोंडेगाव – साटक सर्कल जि.प.सदस्य व्यंकट कारेमोरे, मुरलीधर निंबाळकर, बबन झाड़े, बबलु बर्वे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. या आमदंगल मध्ये विदर्भ व मध्य प्रदेशातील १२५ पहेलवान जोडयांनी कुस्त्या खेळुन सहभाग घेतला होता. यात विशाल पहेलवान नागपुर विरूध्द श्याम यादव खवासा मध्यप्रदेश आणि किसना पहेलवान केरडी, विरूध्द घनश्याम पहेलवान पवनी यांचा सामना रोमहर्षक होऊन उपस्थिताना मंत्रमुग्ध केले. पंच म्हणुन दयाराम भोयर व सेवक गडे यांनी उत्तम कामगिरी बजावली. सुनिल केदार यांच्या हस्ते विजयी पहेलवानाना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

   कार्यक्रमाचे पिंटु नितनवरे यांनी आभार व्यकत केले. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता पांडुरंग काठोके, रामभाऊ हिवसे, सचिन फलके, कैलाश खंडार, पुरुषोत्तम हिवसे, गौरव भोयर, प्रविण सेलारे, बंडु मानवटकर, राजू बंड, राजेन्द्र महल्ले, राजेन्द्र वानखडे, प्रकाश ठाकरे, सचिन खंडार, सुनिल बंड, सुभम हिवसे, धर्मराज खडसे, कवडू कोठेकर सह ग्रामस्थांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गोंडेगाव प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतरण बळजबरीने करणे योग्य होणार नाही- किशोर गजभिये प्रकल्पग्रस्तांचे ८० टक्के स्थलांतरण झाले, २० टक्के स्थलांतरण अद्याप झालेले नाही 

Wed Jan 17 , 2024
गोंडेगाव प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतरण बळजबरीने करणे योग्य होणार नाही- किशोर गजभिये प्रकल्पग्रस्तांचे ८० टक्के स्थलांतरण झाले, २० टक्के स्थलांतरण अद्याप झालेले नाही  कन्हान,ता.१७ जानेवारी    वेकोलि व्दारे कार्यान्वीत गोंडेगाव खुली कोळसा खदान प्रकल्पांतर्गत पूनर्वसन व पूनर्स्थापन योजने अंतर्गत गोंडेगावचे अद्याप १०० % कार्यवाही न झाल्याने अनेक बिगर शेतकरी, कारागिरांच्या घरांना व […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta