जे.एन.रूग्णालयात नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर संपन्न 

जे.एन.रूग्णालयात नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

शिबीरात १९७ नेत्र तपासणी व ९७ मोतीबिंदु शस्त्रक्रिया एकुण २९४ नागरिकांना लाभ.

कन्हान,ता.06 ऑगस्ट

    जवाहरलाल नेहरू हाॅस्पीटल कांद्री येथे वेस्टर्न कोल फिल्डस लिमिटेड नागपुर व महात्मे आय बॅंक, आय हाॅस्पीटल नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले. शिबीरात १९७ नेत्र तपासणी व ९७ मोतीबिंदु शस्त्रक्रिया असे एकुण २९४ नागरिकांना लाभ देत थाटात पार पडले.


शुक्रवार (दि.५) ऑगस्ट रोजी वेस्टर्न कोल फिल्डस लिमिटेड नागपुर व महात्मे आय बॅंक, आय हाॅस्पीटल नागपुर यांच्या संयुक्त विद्यमाने कांद्री जे.एन. हाॅस्पिटल येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीराच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.गुप्ता यांच्या हस्ते वे.को लि. फलकावर पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून महात्मे आय बँक, आय हॉस्पिटल चे डॉक्टर व चंमुचे पुष्पगुच्छाने स्वागत करून शिबीराची सुरूवात कर ण्यात आली. या मोफत नेत्र तपासणी शिबीरात १९६ नागरिकांनी तपासणी केली असुन ९७ नागरिकांची मोतीबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आली.  एकुण २९४ नागरिकांनी शिबीराचा लाभ घेतला. यावेळी मान्यवरांनी नेत्र आजाराचे उपचारा व काळजी विषयी मार्गदर्शन करून शिबीर थाटात संपन्न करण्यात आले. शिबीराच्या यशस्वितेकरिता डॉ.दीपावासे, डॉ.देवघळे, डॉ. भीझनेश्वर प्रसाद, डॉ.नेहा खोब्रागडे, डॉ.व्दिवेदी, डॉ. श्रीवास्तव सह जवाहरलाल नेहरू हॉस्पिटल कांद्री येथील निवासी डॉक्टर, नर्स व कर्मचा-यांनी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दीपक महल्ले कुंटुबास शासना व्दारे चार लक्ष रूपयाची आर्थिक मदत 

Sat Aug 6 , 2022
    दीपक महल्ले कुंटुबास शासना व्दारे चार लक्ष रूपयाची आर्थिक मदत कन्हान,ता.06 ऑगस्ट     मौदा तालुक्यातील ऐसंबा (सालवा) शेतातील बांधीत विज पडुन शेतकरी दीपक महल्ले यांचा घटना स्थळीच मुत्यु झाल्याने येथील सरपंच व परिसरातील ग्रामस्थांनी मुतकांच्या कुंटुबास तातडीने आर्थिक मदतीची मागणी जोर धरल्याने  शासना व्दारे मौदा तहसिलदार च्या […]

You May Like

Archives

Categories

Meta