कोळसा ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा मुत्यु तर दुसरा गंभीर जख्मी

कोळसा ट्रकच्या धडकेत दुचाकी चालकाचा मुत्यु तर दुसरा गंभीर जख्मी

#) दुचाकी चालक धनराज कुंभलकर यांचा घटना स्थळीच मुत्यु. मागे स्वार गंभीर .

कन्हान : – गोंडेगाव डुमरी रोडवर एंसबा गावाजवळील शेतातुन घरी जाणा-या दुचाकी ला गोंडेगाव खुली कोळसा खदान येथुन डुमरी कडे जाणा-या कोळसा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक मारल्याने दुचाकी चालक धनराज कुंभलकर यांचा घटस्थळीच मुत्यु झाला तर मागे स्वार गोविंद दाडे गंभीर जख्मी उसल्याने नागपुर ला उपचार सुरू आहे.
वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खाणीतील कोळसा औष्णीक विधृत केंद्राकरिता दहा, सोळा चाकी ट्रक व्दारे डुमरी रेल्वे कोळसा यार्ड मध्ये व इतर ठिकाणी कोळसा वाहतुक जोमाने सुरू असुन गोंडेगाव खदान ते डुमरी मार्गावरील रस्त्यावर कोळसा ट्रक भरधाव वेगाने ट्रीप जास्त होण्याकरिता ट्रक चालक चालविता त. रविवार (दि.६) ला सांयकाळी ५ .३० वाजता दरम्यान गोंडेगाव कॉलोनी रहिवासी धनराज कुंभलकर वय ४५ वर्ष हे आपल्या एंसबा गावाजवळील शेतातुन होंडा दुचाकी क्र. एम एच ४० ए ए २२९८ ने घरी जात असताना गोंडेगाव कोळसा खदान चा कोळसा भरून डुमरी कडे जाणा-या ट्रक क्र. एम एच ४० वाय ८२१२ च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्का ळजीने चालवुन दुचाकी ला जोरदार धडक मारल्याने दुचाकी चालक धनराज कुंभलकर याचा घटनास्थळीच मुत्यु झाला तर मागे स्वार मित्र गोविंद दाडे वय ४९ वर्ष रा. जुनिकामठी गंभीर जख्मी असल्याने जवाहरलाल नेहरू दवाखाना कांद्री येथे नेले असता डॉक्टरांनी शासकीय रूग्णालय नागपुर ला रवाना केले. गोंविंद दाडे ची प्रकृती चिंताजनक असल्याने नागपुर दवाखान्यात उपचार सुरू आहे.

कन्हान पोलीसाना माहीती मिळताच घटनास्थळी पोहचुन कन्हान थानेदार अरूण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पुढील कारवाई सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन

Sun Dec 6 , 2020
महामानवाला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दीक्षाभूमीवर अभिवादन नागपूर दि.6: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज दिनांक 6 डिसेंबरला उर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दीक्षाभूमीवर विनम्र अभिवादन केले. मुंबई येथील चैत्यभूमीवर सकाळी मुख्यमंत्र्यासह अभिवादन केल्यानंतर ते नागपूरला आले. तेथून थेट दीक्षाभूमीवर आज दुपारी सव्वाबारा वाजता त्यांचे […]

You May Like

Archives

Categories

Meta