नांदगाव, बखारी व वराडा, एसंबा गावकरी शेतक-यांना प्रदुषण मुक्ती करिता लढा लढणार – आदित्य ठाकरे

 

नांदगाव, बखारी व वराडा, एसंबा गावकरी शेतक-यांना प्रदुषण मुक्ती करिता लढा लढणार – आदित्य ठाकरे

कन्हान,ता.२२ मे

  नांदगाव-बखारी येथील बंद राख तलावाच्या जागेवर सौलर उर्जा प्रकल्प उभारण्यास प्राधान्य देऊन व वराडा, एसंबा येथील कोल वॉसरीच्या कोळसा धुळीने त्रस्त गावकरी शेतक-यांना प्रदुषण पासुन मुक्त करे पर्यंत लढा लढणार असे प्रतिपादन केले.

       सोमवार (ता.२२) मे रोजी सायंकाळी ४.३० वाजता युवासेना प्रमुख व माजी पर्यावरण मंत्री मा.आदित्य ठाकरे यांनी नांदगाव ला भेट दिली. नांदगाव, बखारी गांवक-याशी सुसंवाद साधुन राखेच्या तलावामुळे शेती, पेंच नदी, पाणी प्रदुर्षित झाल्याने मंत्री असताना गावक-याच्या मागणी नुसार राख तलाव बंद करून संपुर्ण राख काढुन राखेच्या प्रदुषण पासुन मुक्त केले. परंतु या सरकारने पुन्हा राख तलाव सुरू कराला नको. करायचे झाल्यास बंद राख तलावाच्या २६३ हेक्टर म्हणजे ६५७.५ एकर जागेवर सौलर उर्जा निर्मिती प्रकल्प करून प्रदुषण मुक्त गावक-यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा.

शेती संपादित केलेल्या प्रकल्पग्रस्त शेतक-यांना नौकरी व मोबदला अद्याप न दिलेल्याना देण्यात यावा. तसेच एसंबा येथील गुप्ता वॉसरी च्या कोळसा धुळीच्या प्रदुषण वराडा, एसंबा व वाघोली गावातील शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होऊन सुध्दा फक्त वॉसरी ला लागुन मोजक्या शेतक-यांना तुटपुजे नुकसान दिले. वॉसरी च्या ३ कि.मी.च्या शेतक-यांना व गावक-या कोळसा धुळी जमिन, शेती, नाले व पिण्याचे पाणी प्रदुर्षित होऊन गावकरी शेतक-यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याने ही कोल वॉसरी बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली.

       नांदगाव, बखारी व वराडा, एसंबा, वाघोली च्या गावकरी शेतक-यांना राख व कोळसा धुळीच्या प्रदुषणाचा मोठा फटका बसल्याने  मी आपल्या भविष्याच्या दुष्टीने या शेत शिवारातील कोल वॉसरी बंद करे पर्यंत आणि प्रदुषणा पासुन मुक्त करण्या करिता लढा लढुन येणा-या अधिवेशनात प्रश्न लावुन धरून आपणास न्याय मिळवुन दिल्या शिवाय गप्प बसणार नाही असे मा.आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

    प्रसंगी विरोधी पक्ष नेते मा.अंबादास दानवे, माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव, जिल्हा देवेंद्र गोडबोले, राधेश्याम हटवार, रामटेक विधानसभा संघटक विशाल बरबटे, शिवसेना पारशिवनी प्रमुख कैलास खंडार, लोकेश बावनकर, नगरसेविका मोनिका पौनिकर, पारशीवनी तालुका संघटक गणेश ‌मस्के, नांदगाव सरपंच मिलींद देशभ्रतार, बखारी सरपंच पुष्पाताई ढोणे, माजी जि प अध्यक्ष रश्मी बर्वे, सभापती मंगलाताई निंबोणे, उपसभापती करूणा भोवते, वराडा सरपंच विद्याताई चिखले, माजी उपसभापती देवाजी शेळकी, सिताराम भारव्दाज (पटेल) आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता आकाश रच्छोरे, वनदेव वडे, धर्मेंद्र रच्छौरे, तुषार ठाकरे, क्रिष्णा खिळेकर, सुरज काळे, संजय टाले, सह शिवसेना, युवासेना कार्यकर्ते पदाधिकारी आणि ग्राप सदस्य, ग्रामस्थानी सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

वीज वितरण कंपनीव्दारे नागरिकांना वीजेची भरपाई देणार का? ग्रामीण भागातील नागरिक अंधारात राहून उकाड्यामुळे त्रस्त विद्युत बिल भरण्यास उशीर झाल्यास दंड वसुलीचे आदेश 

Tue May 23 , 2023
वीज वितरण कंपनीव्दारे नागरिकांना वीजेची भरपाई देणार का? ग्रामीण भागातील नागरिक अंधारात राहून उकाड्यामुळे त्रस्त विद्युत बिल भरण्यास उशीर झाल्यास दंड वसुलीचे आदेश कन्हान,ता.२३ मे      शहरासह ग्रामीण भागात व परिसरात कुठलेही वादळ वारा नाही, पाऊस नाही तरी भर उकाडयातील प्रखर तापमानात दिवस व रात्र विद्युत पुरवठा सतत खंडीत […]

You May Like

Archives

Categories

Meta