नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती चे औचित्य साधुन पराक्रम दिवस थाटात 

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती चे औचित्य साधुन पराक्रम दिवस थाटात

कन्हान,ता.२३ जानेवारी

भारतीय स्वातंत्र्य सैनिक भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी सेनानी आणि महान नेते नेताजी सुभाष चंद्र बोस यांची १२७ जयंती शहर विकास मंच द्वारे पराक्रम दिवस म्हणुन थाटात पार पडला.

सोमवार (दि.२३) जानेवारी रोजी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंती चे औचित्य साधुन पराक्रम दिवस निमित्य शहर विकास मंच द्वारे कार्यक्रमाचे आयोजन संताजी नगर कांद्री येथे करण्यात आले होते. कार्यक्रमात प्रामुख्याने उपस्थित संस्थेचे मार्गदर्शक ताराचंद निंबाळकर यांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प हार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरूवात‌ करण्यात आली . यावेळी संस्थेचे मार्गदर्शक भरत सावळे, प्रभाकर रुंघे यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवन चिरित्र्यावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित सर्व मंच पदाधिकार्यांनी व सदस्यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पित करुन विनम्र अभिवादन करीत नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती पराक्रम दिवस म्हणुन थाटात साजरी करण्यात आला.प्र

प्रसंगी कन्हान शहर विकास मंच संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर, सचिव सुरज वरखडे, सहसचिव प्रकाश कुर्वे, शाहरुख खान, हरीओम प्रकाश नारायण, सत्यराम राय सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रामसरोवर टेकाडी येथे आखाडा अभ्यास स्पर्धा व पत्रकारांचा सत्कार

Mon Jan 23 , 2023
रामसरोवर टेकाडी येथे आखाडा अभ्यास स्पर्धा व पत्रकारांचा सत्कार कन्हान,ता.२३ जानेवारी    गुरूकृपा मर्दानी आखाडा टेकाडी व्दारे रामसरोवर शितला माता मंदीर ये़थे टेकाडी, निमखेडा येथील शिवकला मर्दानी आखाडा (दांडपट्टा) खेडाळु चा एक दिवसीय अभ्यास व स्पर्धा घेऊन कन्हान च्या पत्रकारांचा सत्कार सोहळा पार पडला. रविवार (दि.१५) जानेवारी ला सकाळी शिवसेना […]

You May Like

Archives

Categories

Meta