निलज (खंडाळा) येथे २५ लाखाचा दरोडा मोठी घटना ; पोलिस प्रशासनावर ?

निलज (खंडाळा) येथे ५ लाखाचा दरोडा

कन्हान : – पोलीस स्टेशन पासुन पुर्वेस ४ कि.मी अंतरावरील निलज (खंडाळा) येथील कैलास कारेमोरे यांच्या घरी कुणी नसल्याचे पाहुन रात्री अज्ञात चोरानी दरोडा टाकुन घरातील नगदी १ लाख रू.१० तोळे सोने, १ पाव चांदी व इतर जवळपास अदाजे १० ते १५ लाखाचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याने परिसरा तील गावा मध्ये चांगलेच भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.


कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत निलज (खंडाळा ) येथील गोंडेगाव-साटक जि प सदस्य व्यकटराव कारेमोरे यांचे लहान भाऊ कैलास कवडुजी कारेमोरे वय ३४ वर्ष यांचे गावालगत शेतात घर असुन ते परिवारा सह काही कामानिमित्य बाहेर गावी गुजरात ला गेले आहे. त्यांच्या घरी कुणी नसल्याची संधी साधुन बुधवार (दि.६) एप्रिल २०२२ ला रात्री अज्ञात चोरानी दरोडा टाकुन घरातील नगदी एक लाख रूपये, वडिलो पार्जित आजीआजोबाचे १० तोळे सोने, १ पाव चांदी चे दागीने व इतर सामान असा अदाजे जवळपास १० ते १५ लाखाचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याचे गुरूवार (दि.७) एप्रिल सकाळ ला लागुनच असलेल्या कुंटुबियाना लक्षात आल्याने घटनेची माहीती जि प सदस्य व्यकटराव कारेमोरे यांनी कन्हान पोलीसाना दिली तरी उशीरा सकाळी ११.३० वाजता दरम्यान कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे, पी एस आय महादेव सुरजुसे आपल्या पोलीस कर्मचा-याच्या ताफा सह घटनास्थळी पोहचुन पाहणी केली. कन्हान पोलीसानी फिर्यादी अजाब कवडुजी कारेमोरे यांच्या तोंडी तक्रारीवरून सोन्याची १) चैन १२ ग्रॅम, २) चैन २० ग्रम, ३) ३ नग अंगठया १५ ग्रम, ४) कानातले सोन्याचे २ जोड ६ ग्रम ५) २ नग मंगळसुत्र ३५ ग्रम, ६) १ मंगळसुत्र ३० ग्रम, ७) १ एकदाणी १० ग्रम असे एकुण १२८ ग्रम २५ हजार रूपये तोळे प्रमाणे ३ लाख २० हजार व १ लाख नगदी असे एकुण ४ लाख २० हजार रूपयाचा मुद्देमाल चोरी झाल्याची नोंद करून कन्हान पोलीस निरिक्षक विलास काळे यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस घटनेचा पुढील तपास करित आहे.
कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात अवैद्य धंद्याना सुगीचे दिवस आल्याने कोळसा, रेती, लोंखड, डिझेल, घरफोडी व इतर अनेक चो-या, मारामारी, लुटमार वाढुन सर्व सामान्य नागरिकात भितीचे वातावरण निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नाजुक होत आहे. कन्हान थानेदार विलास काळे व पोलीसाच्या कार्य पध्दतीवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले असुन सुध्दा वरिष्ठ पोलीस अधिकारी मुंग गिळुन गप आहेत का ? अशी चर्चा कन्हान परिसरात चांगलीच रंगात येत असल्याने शासन, प्रशासनाने वेळीच संबधित पोलीस अधिका-यावर योग्य कार्यवाही करून कन्हान परिसरात शांती सुव्यवस्था कायम करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांच्या चर्चेतुन सामोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

दोन दुचाकी च्या अपघातात एकाचा मुत्यु तर दुसरा गंभीर जख्मी

Fri Apr 8 , 2022
दोन दुचाकी च्या अपघातात एकाचा मुत्यु तर दुसरा गंभीर जख्मी कन्हान : – शहरातील नागपुर जबलपुर चारपदरी महामार्गाच्या दोन्ही बाजुला वसलेले असुन महामार्गा वर व लगत फुटपाथावर दिवसेदिवस अतिक्रमण वाढ ल्याने महामार्गावरील स्टेट बॅक व खंडेलवाल लॉज समोर दोन दुचाकीचा अपघातात एका इसमाचा मुत्यु झाला तर दुस-या दुचाकी चालक गंभीर […]

You May Like

Archives

Categories

Meta