कांद्री येथे सोन्यासह सवा दोन लाखाची घरफोडी

कांद्री येथे सोन्यासह सवा दोन लाखाची घरफोडी

कन्हान,ता.२६ डिसेंबर

    पोलीस स्टेशन अंतर्गत कांद्री वार्ड क्रमांक पाच येथील गजानन मंदिरा जवळील कविता शुक्ला यांचा घरामधून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून सोन्याचे दागिण्या सह एकूण दोन लाख पंच वीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी कविता शुक्ला यांचे तक्रारीनुसार अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून केला आहे .

    ‌‌प्रा‌‌प्त माहिती नुसार, मंगळवार (दि.२१) डिसेंबर रोजी सौ.कविता राकेश शुक्ला (वय ५५) रा.गजानन मंदिर कांद्री ही आपल्या पती सोबत त्यांची लहान मुलगी कु.प्रिंसी शुक्ला ला भेटायला जाण्याकरिता घरातील सर्व दरवाजे, खिड़की बंद करुन मुख्य दरवाजाला कुलुप लावुन दुपारी १.३० वा. नागपुर ला निघाले. दुपारी ४ वाजता दरम्यान कविता शुक्ला व त्यांचे पती रेल्वेत मध्ये बसुन नागपुर वरून दिल्ली ला निघाले. प्रवास करते वेळी बुधवार (दि.२२) डिसेंबर ला सकाळी ७.५० वाजता कविता शुक्ला यांना त्यांचे घरा शेजारी राहणा-या सौ.वर्मा यांनी फोन करून सांगितले की, तुमच्य घराचा दरवाजा उघडा आहे. अश्या माहिती वरून कविता शुक्ला यांनी आपल्या दिर धर्मराज शुक्ला रा.साई नगर कन्हान यांना फोन करून घराकडे जावुन पाहणी करायला सांगितले. तसेच कविता शुक्ला यांनी आपल्या लहान मुलीला फोन मध्ये ऑन लाईन सीसीटीवी कैमरे चेक करायला सांगितले. असता लहान मुली ने घरी चोरी झाल्याची माहिती दिली. दिर धर्मराज शुक्ला यांनी कविता शुक्ला यांना घराच्या बेडरुम मधील समान अस्त व्यस्त पडुन असल्याची माहिती दिली.

   गुरूवार (दि.२३) डिसेंबर ला कविता शुक्ला हे आपल्या लहान मुलीला घेऊन दिल्ली वरुन नागपुर ला निघुन (दि.२४) डिसेंबर ला कविता शुक्ला हे आपल्या लहान मुली सोबत नागपुर ला पहोचुन त्यांनी आपल्या घरी येऊन पाहणी केली. घरातील दरवाज्याची कड़ी तुटलेल्या अवस्थेत दिसली आणि बेडरूम मध्ये लावलेले कुलुप तुटलेला दिसले. आत जाऊन पाहणी केली असता बेडरूम मधिल दोन लाकड़ी आलमारीचे कुलुप तुटलेला असुन आलमारीत ठेवलेली सोन्याची पानछाप आंगठी ५.६९ ग्रॅम, पिट्टु सोन्याचे मनी ०५ ग्रँम, जेन्टस् सोन्याची आंगठी ४.८१ ग्रँम, सोन्याची नथ १.६६ ग्रँम, चांदी चे कंगन किंमत ३००० रूपये आणि नगदी ३००० रूपये दिसले नाही. कविता शुक्ला यांनी पुजा घरात जाऊन पाहणी केली असता पुजा घरात ठेवलेले. एक जेन्टस् सोन्याची चैन १०.०० ग्रँम, २ सोन्याचा गोप २० ग्रँम, २ सोन्याचे मंगलसुत्र १५ ग्रँम, ३ जेन्टस आंगठी १५ ग्रँम, १ लेडी सोन्याची आंगठी ४. ८१ ग्रँम, २ सोन्याच्या कानाची बाली २.५० ग्रँम असा एकुण ८९.९७ ग्रँम चा सोने १० ग्रँम २५,००० रूपये प्रमाने एकुण २,२५,००० रूपयाचा मुद्देमाल कोणीतरी चोरट्यांनी घरफोडी करित चोरून पसार झाल्याने कन्हान पोलीसांनी कविता शुक्ला यांचे तक्रारीने पोस्टे कन्हान ला अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. ७५१/२२ कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा सीसीटीवी फुटेज च्या आधारे आरोपीचा शोध घेत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

३० तारखे नंतरच कोलवाशरी वर कारवाई करण्याचे प्रदुषण विभागकडून आश्वासन.  कोलवॉशरी बंद न केल्यास इच्छा मरण आत्महत्या करण्याची परवानगी द्या- शेतक-यांची मागणी

Mon Dec 26 , 2022
३० तारखे नंतरच कोलवाशरी वर कारवाई करण्याचे प्रदुषण विभागकडून आश्वासन. कोलवॉशरी बंद न केल्यास इच्छा मरण आत्महत्या करण्याची परवानगी द्या- शेतक-यांची मागणी. कन्हान,ता.२६ डिसेंबर (सुनिल सरोदे)   पारशिवणी तालुक्यातील गोंडेगाव कोळसा खुली खदान लगत वराडा व मौजा एसंबा येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळा द्वारे महा मिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लिमिटेड […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta