३० तारखे नंतरच कोलवाशरी वर कारवाई करण्याचे प्रदुषण विभागकडून आश्वासन.  कोलवॉशरी बंद न केल्यास इच्छा मरण आत्महत्या करण्याची परवानगी द्या- शेतक-यांची मागणी

३० तारखे नंतरच कोलवाशरी वर कारवाई करण्याचे प्रदुषण विभागकडून आश्वासन.

कोलवॉशरी बंद न केल्यास इच्छा मरण आत्महत्या करण्याची परवानगी द्या- शेतक-यांची मागणी.

कन्हान,ता.२६ डिसेंबर (सुनिल सरोदे)

  पारशिवणी तालुक्यातील गोंडेगाव कोळसा खुली खदान लगत वराडा व मौजा एसंबा येथे महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळा द्वारे महा मिनरल मायनिंग व बेनिफेकिशन लिमिटेड कोल वाशरी चा प्लांट मार्च २०२१ ला सुरू करण्यात आला. या कोल वॉशरी मध्ये गोंडेगाव कोळसा खदान व इतर खदान येथुन येणा-या कोळसा वॉश करताना उडण्या-या धुळी मुळे वराडा आणि परिसरातील ६०० एकर वर शेती प्रदुषित झाली आहे. कोळसा धुळ मिश्रीत पाण्यामुळे जमिनीतील पाणी सुध्दा प्रदुषित झाले आहे. धुळकणा मुळे गावकयांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

       यास्तव स्थानिक सरपंच, शेतकरी व जय जवान जय किसान संघटना, कांग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष व इतर संघटने ने (दि.२३) डिसेंबर ला परिसर प्रदुषण मुक्त करण्यास कंपनी बंद करावी या करीता आंदोलन केले. वरिष्ठ अधिका-यां सोबत फोन वर चर्चा करून कंपनीस टाळे लावण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु कंपनी सुरू ठेऊन चोरीने कोळसा भरलेले ट्रक काढत असल्याने आंदोलन कर्त्यांनी (दि.२४) ला धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचे ठरविले. या दरम्यान मध्य रात्री १ वाजता उपविभागिय पोलीस अधिकारी यांच्या उपस्थित कन्हान पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना अटक करून नगरपरिषद येथे कोंबुन १७ तास बंदी बनवुन ठेवले व सकाळी सरपंचा सह महिलांना कन्हान पोलीस स्टेशन ला बंदी बनवुन ठेवले. पोलिसांनी आम्हाला येथे बंदी म्हणुन ठेवले का ? व गुन्हे दाखल का करित नाही असे विचारले असता टाळाटाळीचे उत्तर देण्यात आले. यामुळे सोमवार (दि.२६) डिसेंबर ला या बाबत विचारणा करण्यासाठी वराडा व एसंबा येथील शेतक-यांनी जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळा च्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. पोलीसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त यावेळी होता. कंपनी बंद करावी या बाबत विभागीय अधिकारी अशोक करे यांना जाब विचारण्यात आला. करे यांनी आमचे वरिष्ठ अधिकारी बोलतील असे सांगुन महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक विद्यानंद मोटघरे यांच्याशी चर्चा केली. येत्या ३० तारखे नंतर ३१ तारखे ला कंपनीचे निरिक्षण करून कारवाई करण्याचे त्यांनी आश्वासन देण्यात आले. येत्या ३० तारखे नंतर ६०० एकर वर शेती व गावास कंपनी च्या उडणा-या कोळश्या धुळी पासुन मुक्त करण्यास कंपनी बंद करण्याची ठोस भुमिका न घेतल्यास आम्हा शेतक-यांना इच्छा मरण आत्महत्या करण्यास परवानगी देण्यात यावी. अशी शेतक-यांनी मागणी केली. या आंदोलनात जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांतजी पवार, कांग्रेस नेते चंद्रपाल चौकसे, वराडा येथील सरपंचा विद्याताई चिखले, जय जवान जय किसान संघटना सहसचिव प्रकाश डोंगरे, अभिनव फटिंग, निलिकेश कोल्हे, उत्तम सुळके व शेतकरी हिरालाल खिळेकर, दिलीप चिखले, ग्रा पं सदस्य कैलास तेलंगे, राहुल भालेराव, कृष्णा खिळेकर, संदिप पांडे, धमेंद्र किनेकर, शालुबाई खिळे कर, सविता चिखले, उषाबाई खिळेकर, शुभांगी घारड, शारदाबाई तेलंगे सह शेकडो च्या वर शेतकरी प्रामुख्या ने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शहर विकास मंच व्दारे साखळी उपोषणाला समर्थन

Wed Dec 28 , 2022
शहर विकास मंच व्दारे साखळी उपोषणाला समर्थन कन्हान,ता.२९ डिसेंबर     शहरातील राष्ट्रीय महामार्गा वरील हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड कंपनीची संपुर्ण १८.७८ एकड जागा ग्रोमोर वेंचर ग्रुप द्वारे खरेदी करण्यात आल्याने शहराच्या सर्वांगीण विकास कार्या आणि मुलभुत सुविधा वर प्रश्न निर्माण झाल्याने सर्व पक्षीय नागरिक कृती समिती व व्यापारी संघटनेच्या वतीने […]

You May Like

Archives

Categories

Meta