शाहिरांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेणार : सुधीर मुनगंटीवार

शाहिरांच्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेणार : सुधीर मुनगंटीवार

नागपूर, दि. 20 डिसेंबर 2022

राज्यातील शाहिरांच्या समस्यांची शासनाला जाणीव असून त्या समस्यांवर सकारात्मक निर्णय घेत मार्ग काढला जाईल. अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री मा.श़्री.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. राज्य विघिमंडळाच्या अधिवेशनात मोर्चा घेऊन आलेल्या भारतीय कलाकार शाहीर मंडळ आणि महाराष्ट्र शाहिर परिषदेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते बोलत होते.

    यावेळी बोलतांना ना.श्री.सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले की महाराष्ट्राच्या संस्कृतीत शाहिरांचे मानाचे स्थान आहे. महाराष्ट्राचा इतिहास गावागावात लोकांच्या मनात जीवंत ठेवण्याचे काम शाहिरांनी केले आहे. अशा शाहिरांकडे शासन दुर्लक्ष करणार नाही. मात्र अनुदानाच्या मदतीवर शाहिरांनी अवलंबून राहू नये तर त्यांना काम देता यावे असा शासनाचा प्रयत्न आहे. शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या प्रसिद्धी प्रसाराच्या कामी शाहिरांची कला कशी वापरता येईल याची शहानिशा करीत आहोत असे त्यांनी शाहिरांच्या प्रतिनिधी मंडळाला सांगितले.

   कोरोना काळात कलाकारांना मदत देण्याची घोषणा तत्कालीन सरकारने केली. मात्र त्यासाठी माहिती गोळा करण्याचे काहीही काम तत्कालीन सरकारने केले नाही. त्यामुळे कलाकारांना तेव्हा मदत मिळू शकलेली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यामुळेच आता आपण राज्यातील कलाकारांचा डेटाबेस तयार करण्याच्या सूचना विभागाला दिल्या आहेत असे सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.

    शाहीर कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून मनोरंजन करीत जनजागृती व समाजप्रबोधन करीत असतो. आज या कलावंतांची परिस्थिती हालाखीची झाली आहे. त्यामुळे आपल्या विविध मागण्यांसाठी भारतीय कलाकार शाहीर मंडळ व महाराष्ट्र शाहीर परिषदने विधानभवनावर मोर्चा काढला. शाहीर व कलावंतांनी वेशभुषेसह आपल्या पारंपारिक नृत्य सादर केले. वृद्ध कलावंतांच्या मानधनात वाढ करण्यात यावी, जिल्हा मानधन समितीची बैठक वर्षातून दोन वेळा व्हावी, लोक कलावंतांना आरोग्य सेवा मोफत करण्यात यावी, उत्पन्नाची मर्यादा ५० हजारावरून २ लाख रुपये करण्यात यावी, कलावंतांना शासनातर्फे ओळखपत्र देण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.

    या‌‌ शिष्टमंडळात महाराष्ट्र शाहिर परिषदेचे हितचिंतक भारतीय कलाकार शाहीर मंडळ आणि महाराष्ट्र शाहिर परिषदेचे पदाधिकारी शाहिर राजेंद्र भीमराव बावनकुळे, डॉ संजय बजाज, भगवान लांजेवार, ज्ञानेश्वर वांढरे, अंबादास नागदेवे, नरहरी वासनिक, दीपमाला मालेकर, गणेश देशमुख,वसंता कुंभरे, अरूण मेश्राम , चिरकुट पुंडेकर आदी उपस्थित होते. यावेळी सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय यांच्यासह काही प्रमुख अधिकारीही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

विदर्भ विभागीय कुस्ती स्पर्धेत तन्मय चरडे प्रथम

Tue Dec 20 , 2022
विदर्भ विभागीय कुस्ती स्पर्धेत तन्मय चरडे प्रथम कन्हान,ता.२० डिसेंबर   क्रीडा व सांस्कृतिक संचालना लय, महाराष्ट्र राज्या व्दारे आयोजित विदर्भ विभागीय क्रीडा स्पर्धा, वर्धा जिल्हयातील देवळी येथे संपन्न झाली. यात धर्मराज विद्यालयाच्या विद्यार्थी खेडाळु तन्मय चरडे यांने प्रथम क्रमांक पटकावित राज्य स्पर्धेत प्रवेश निश्चित केल्याने तन्मय चरडे चे अभिनंदन करून […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta