कन्हान येथून शिर्डी करिता पालखी पदयात्रेचे जल्लोषात प्रस्थान श्री साईराम पालखी सोहळा समिती व्दारे १४ व्या वर्षी आयोजन

कन्हान येथून शिर्डी करिता पालखी पदयात्रेचे जल्लोषात प्रस्थान

श्री साईराम पालखी सोहळा समिती व्दारे १४ व्या वर्षी आयोजन 

कन्हान, ता. २७ मार्च 

   श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान जि.नागपुर व्दारे १४ व्या वर्षी बुधवार (दि.२७) साई पालखीचे आयोजन करण्यात आले. ही पालखी सोहळा श्री साई मंदीर इंदिरा नगर, कन्हान येथुन पुजा करून तारसा रोड ते नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गाने भव्य मिरवणुकी सह पालखी पदयात्रा फुलाच्या वर्षावात व‌ भाविकांच्या जल्लोषात स्वागत करित शिर्डी कडे प्रस्थान करण्यात आली. 

पालखी मानाची …… साईंच्या भक्तांची …….

भगवा रंग उधळूनी आकाशी किनार दाटली,

मस्तकी मुकुट चढवूनी मुर्ती बाबांची सजली।

गळ्यात माळ फुलांची, सिंहासन सुभोभिती, 

कपाळी शोभे टिळा सोनेरी, अंगावर शुभ्र शाल चढली।

पाहुनी मुर्तीमंत रूप तेजस्वी सूर्य किरणही ढगा आळ ढळली,

पुष्पहारात नाहली मुर्ती, स्थासनी विराजमान झाली । 

जाहला जयघोष साईरामाचा, ढोलताशांची मानवंदना झाली,

डोल लागला निशान भगवा, अन पालखी निघाली शिर्डीला । 

         बुधवार (दि.२७) मार्च ला सकाळी ११ वाजता श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान. जि. नागपुर व्दारे १४ व्या वर्षी श्री साई मंदीर इंदिरा नगर, कन्हान येथे पुजा अर्चना करून तारसा रोड मार्गे नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ ने भव्य मिरवणुक काढण्यात आली.

   पालखी पदयात्रा फुलाच्या वर्षावाने भाविकांनी स्वागत करित शिर्डी करिता प्रस्थान करून मोठ्या संख्येने कन्हान शहरातील भाविकांनी साई मंदीर आडापुल, कामठी येथे साई दर्शन घेतले. पुढे कामठी मार्गे श्री साई कृपा संस्थान नागार्जुन कॉलोनी जरीपटका रिंग रोड नागपुर येथे सायंकाळी पोहचुन श्री नरेंद्र हेमराजानी तर्फे पदयात्रे करूची जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली. दुस-या दिवसी गुरूवार (दि.२८) मार्च ला सकाळी ७ वाजता शंभर साई भक्त पालखी पदयात्रेत सहभागी होऊन कळमेश्वर मार्गे पुढे मार्गक्रम करतील. अशा प्रकारे दरवर्षी प्रमाणे सतत २२ दिवस हा पालखी व पदयात्रा सोहळा थाटात साजरा करण्यात येईल. 

 पालखीची दिनचर्या : –

   सकाळी ५.३० वा. काकड आरती, सकाळी ६.३० वा. मंगलस्नान व अभिषेक, दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती / नैवेद्य, दुपारी ४.३० वा. साई गुरुपाठ अभंग, सायंकाळी ६.४५ वा. धुप आरती / नैवेद्य, रात्री १०.३० वा. शेजारती. 

   मंगळवार (दि.९) गुडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर साई सच्चरित्र साप्ताहिक पारायण श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

 

Sun Apr 7 , 2024
Post Views: 693

You May Like

Archives

Categories

Meta