पारशिवनी तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपिटी मुळे ५०७६ शेतक-यांच्या शेतपिकाचे नुकसान

पारशिवनी तालुक्यात अवकाळी पाऊस, गारपिटी मुळे ५०७६ शेतक-यांच्या शेतपिकाचे नुकसान

कन्हान : – मागील आठवडयात झालेल्या अवकाळी जोरदार पाऊस व गारपिटीमुळे पारशिवनी तालुक्यातील आदिवासी बहुल सह ४३ गावातील ५०७६ शेतकर्‍यांच्या ३४३८.१० हेक्टर आर जिरायत पिक, बगायत पिक, फळपीक सह विविध पिकांचे नुकसान झाल्याचे महसूल विभाग पटवारी, कृषी विभाग व पंचायत समितीचे कृषी विभाग अधिकारी यांच्या संयुक्तपणे वरील सर्वेक्षणात प्राथमिक अंदाज पाहणी अंती समोर येऊन शेतक-यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे.
मागील दोन वर्षात कोरोना मुळे सर्वाचेच भारी नुकसान झाले असुन शेतकरी चांगलाच अडचणीत असताना यावर्षी अवकाळी जोरदार पाऊस व गारपिटीने शेतातील कापुस, तुर, गहु, हरभरा, वागी, गोबी, टमाटर, भाजीपाला, मोसंबी, सत्रा, जाब, बोर आदी पिके भुईसपाट झाल्याने शेतक-याचे नुकसान होऊन तो चिंतातुर झाला आहे. दि.११ जानेवारी २०२२ ला झालेल्या अतिवृष्टी जोरदार पाऊस व गारपिटीमुळे पारशिवनी तालुक्यातील आदिवासी बहुल सह ४३ गावातील ५०७६ शेतकर्‍यांच्या ३४३८.१० हेक्टर आर जिरायत पिक, बगायत पिक, फळपीक आणि विविध पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज पाहणी अंती समोर आला आहे.

प्राप्त माहीतीनुसार तहसिलदार, कृर्षी अधिकारी , गटविकास आधिकारी यांचे आदेशाने महसुल विभागाचे पटवारी, कृषी विभाग व पंचायत समितीचे कृषी विभाग अधिका-यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण केले. असुन गारपीट व पावसाचा फटका बसलेल्या शेतकर्‍याच्या शेतात झालेल्या नुकसानीचा सर्वेक्षण व पंचनाम्या नुसार १) जिरायत पिक बाधित श्रेत्र अंर्तगत एकुण २४६८.०५ हेक्टर आर च्या ३४२३ शेतकयांचे १.६७. ८२.७४० रूपयांचे नुकसान झाले. २) बगायती पिक क्षेत्र एकुण ८८२.७५ हेक्टर आर पिक बाधित झाल्याने १५११ शेतक-यांचे १.१९.१७.१२५ रूपयाचे नुकसान झाले. ३) फळपिकांचे एकुण ८७.३० हेक्टर आर पिक १४२ शेतक-यां चे एकुण १५.७१.४०० रूपयांचे नुकसान झाले. असे पारशिवनी तालुक्यातील एकुण ३४३८.१० हेक्टर आर शेत पिक क्षेत्र अवकाळी जोरदार पाऊस व गारपिटीने प्रभावित होऊन तालुकातील एकुण ४३ गावातील ५०७६ शेतक-यांचे ३,०२,७१,२६५ रूपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक सर्वेक्षण अहवाला नुसार क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती तहसिलदार, बी ड़ी ओ, कृर्षी अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या मार्फत जिल्हाधिकार्‍यांकडे आवश्यक कार्यवाहीसाठी अग्रेसर केली आहे.

    राज्य सरकार कडुन लवकरात लवकर नुकसान भरपाईची रक्कम मिळवुन देण्यासाठी पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, आ. आशिष जयस्वाल, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी, जि प अध्यक्षा, जि प सदस्य, पं स सभापती यांनी नुकसान ग्रस्त गावांना भेटी देऊन बाधित शेतकर्‍यांना आश्‍वासन देण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

डुमरी (कला) येथे स्वच्छता अभियांतर्गत श्रमदान

Thu Jan 20 , 2022
डुमरी (कला) येथे स्वच्छता अभियांतर्गत श्रमदान कन्हान : – नेहरू युवा केंद्र नागपूर, खेल व युवा मंत्रालय भारत सरकार आणि समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय संस्था टेकाडी च्या संयुक्त विद्यमाने डुमरी (कला) गावा मध्ये स्वच्छता अभियान अंतर्गत श्रमदान करून गाव स्वच्छ करण्यात आले. कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta