वराडा येथे शिबीरात ६५ नागरिकांचे लसीकरण

वराडा येथे शिबीरात ६५ नागरिकांचे लसीकरण

#) कन्हान परिसरात ११३ लोकांचे लसीकरण. 

कन्हान : –  प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे उप केंद्र वराडा येथे लसीकरण शिबीर घेऊन ६५ नागरिकां ना लसीकरण करण्यात आले. तर प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान – ३७, जे एन दवाखाना कांद्री ११ असे कन्हान परिसरात एकुण ११३ लोकांना लसीकरण करण्यात आले. 

            कोरोना विषाणु जिवघेण्या आजारा पासुन सुरक्षित करण्याकरिता शासना व्दारे ४५ वर्ष व त्या वरील वयाच्या नागरिकांना मोफत लसीकरण मोहीम राबवुन लसीकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत मंगळवार (दि.८) जुन २०२१ ला प्राथमिक आरोग्य केंद्र साटक च्या वैद्यकीय अधिकारी वैशाली हिंगे यांचे मार्गदर्शनात व ग्रा प वराडा सरपंचा विद्याताई चिखले यांच्या प्रमुख उपस्थितीत उपकेंद्र वराडा येथे लसीकर ण शिबीर घेऊन ६५ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. शिबीराच्या यशस्वितेकरिता सीएचओ सायली शेळकी, प्रेरणा घोटेकर, उषा जंगम, सोनटक्के, डोणार कर आदीने परिश्रम घेतले. 

       प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान येथे ३७, वेकोलि जे एन दवाखाना कांद्री ११ व प्रा.आ कें.साटक व्दारे ६५ असे कन्हान परिसरातील एकुण ११३ नागरिकांना लसीकरण करण्यात आले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान पोलीसांनी हरविलेल्या मुलीचा शोध लावला 

Mon Jun 14 , 2021
कन्हान पोलीसांनी हरविलेल्या मुलीचा शोध लावला  कन्हान : – पोस्टे ला हरविल्याची तक्रार असलेली मुलगी ममता शेंडे हिचा कन्हान पोलीसांनी शोध घेऊन कारधा जि भंडारा येथील सोमेश दुनाडे यांचे शी तिने लग्न केल्याने तिच्या पतीच्या स्वाधिन करण्यात आले.         कन्हान पोलीस स्टेशन ला मिसींग क्र २३/२१ मधिल हरविलेली मुलगी […]

You May Like

Archives

Categories

Meta