विविध ठिकाणी बैलपोळा व तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजराबळीराजाची गर्जना, झुकेगा नही, लढेगा…..

विविध ठिकाणी बैलपोळा व तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजराबळीराजाची गर्जना, झुकेगा नही, लढेगा…..

कन्हान, ता.28 ऑगस्ट

    पारशिवनी तालुक्यातील कन्हान शहरात व ग्रामीण भागात मागील दोन वर्षे कोरोना संसर्गजन्यामुळे खंडीत झाला होता तो यावर्षी बैलपोळा व लाकडी नंदीचा दोन दिवसीय पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात ठिकठिकाणी बैलपोळ्याचा दुसर्‍या दिवशी बडग्या-मारबत तसेच लाकडी नंदि बैलाच्या  कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कन्हान व कान्द्री गावात मोठ्या बैल पोळयात विस ते तीस बैलजोड्या उपस्थित होत्या यावेळी स्वतः आत्महत्या न करण्याची व इतरांना न करू देण्याची शेतकऱ्यांनी सामुहिक शपथ घेतली. क्रांन्दी सरपंच बलवंत पडोळे यांनी संकटात असलेला माझ्या गावातील शेतकऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा राहील अशी शपथ उपस्थित शेतकऱ्यांना दिली. यावेळी उपसरपंच श्यामकुमार बर्वे, गणेश सरोदे आदी शेतकरी उपस्थित होते.

तसेच शुक्रवार रोजी कन्हान परिसरातील पिपरी, कांद्री, टेकाडी, निलज, येसंबा सह अनेक गावात बैलपोळा निमित्य कार्यक्रमाचे आयोजन करुन महिलांनी, नागरिकांनी बैलांची विधिवत पूजा अर्चना करून तोरण तोडुन प्रसाद वितरित करुन बैलपोळा साजरा करण्यातआला. दुसऱ्या दिवशी लहान मुलांना लाकडी नंदी तान्हा पोळा तारसा रोड निर्णय प्रतिष्ठाण शिवनगर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी रामभाऊ दिवटे व  डाॅ.श्रीकृष्ण जामोदकर यांच्या हस्ते लाकडी नंदीची विधिवत पुजा, आरती व लहान मुलांचा  खाऊ वाटप करून तान्हा पोळा उत्सव कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन निर्णय कुंभलकर व आभार प्रदर्शन ऋषी कोचे यांनी केले. यावेळेस कार्यक्रमाचे आयोजन सुर्यभान कुंभलकर व सुशील ठाकरे उपस्थित होते. यावेळी नरेश नाटकर, ज्ञानेश्वर हुड, ऋषी कोचे, निर्णय कुंभलकर, सुनिल सरोदे, शुभम कुंभलकर, कु.मोनिश हुड, कु.कुणाल भोंगाडे, मंमर चकोले, डाॅ.दापुरकर साहेब  प्रमुख पाहुणे सुंनदा दिवटे, प्रतीभा कुंभलकर, इंदूबाई कोचे,पुष्पलता कुंभलकर, जया कुंभलकर, पुजा कुंभलकर, प्रीया कोचे, मोनाताई कोचे, श्वेता दिवटे, अरूणाताई बावनकुळे, त्रिवेणी सरोदे, अक्षय श्रावणकर, कल्पणा श्रावणकर, चंदभान कुंभलकर आदी उपस्थित होते.तसेच अशोक नगर, कन्हान येथे “भव्य तान्हा पोळा” चे आयोजन मनिष धर्मदासजी भिवगडे (नगर सेवक, न.प.कन्हान तथा गटनेता) यांच्या द्वारे करण्यात आले. बाळगोपाळांद्वारे परिधान केलेले सर्वोत्कृष्ट वेशभुषा, सर्वोत्कृष्ट नंदी व उत्तम सामाजिक संकल्पना इत्यादी विषयांवर प्रथम, द्वितीय व तृतीय पारितोषिक आणि सहभागी सर्व चिमुकल्यांना प्रोत्साहन बक्षिश वितरण – कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी मा. श्री. राजेंद्रजी मुळक (माजी मंत्री तथा नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी) यांच्या हस्ते करण्यात आले.त्या शुभ प्रसंगी सौ. रिताताई नरेशजी बर्वे (अध्यक्षा, कन्हान शहर महिला काँग्रेस कमिटी), किशोरजी बेलसरे, अमोल प्रसाद,अनिल गजभिये, अनिल पाटील, निखिल बागडे, महेश घोंघडे, कुणाल चव्हाण, स्वप्निल नितनवरे, राजिक सिद्दीकी, आशिष गोंडाने, पिंटू चव्हाण, उत्कर्ष आंबागडे, प्रणय भिवगडे आणि समस्त अशोक नगर मित्र परिवार व शहरवासी आवर्जून उपस्थित होते. स्थानिय कांन्द्री येथील लहान हनुमान मंदिर जवळ लहान मुलांचा तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. पोळ्यामध्ये लहान मुलांनी विविध प्रकारे वेषभूषा करून पोळ्यामध्ये सहभाग घेतला सहभागी सर्व लहान मुलांना दुर्गाताई सरोदे ग्रा.पं. सदस्या यांच्या कडून पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळेस राजू देशमुख, गणेश सरोदे, अभय जांबूतकर, गजानन हटवार, नंदू मस्के, रोशन बावणे, अंकुश कुंभलकर, तुळशीदास मस्के, आदीने सहकार्य केले. तसेच परिसरातील ठिकठिकाणी, गावात, लहान मुलांच्या तान्हा पोळा कार्यक्रमाचे आयोजन करुन विधिवत नंदी बैलांची पुजा अर्चना करुन लहान मुलांना बिस्कीट, चिप्स व स्टेशनरी वाटप करुन परिसरात दोन दिवसीय पोळा सण उत्सव मोठ्या उत्साहात थाटात साजरा करण्यात आला. शहरात व परिसरात कुठल्याही प्रकारची अनुचीत घटना घडु नये म्हणून पोलीसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

विविध ठिकाणी बैलपोळा व तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजराबळीराजाची गर्जना, झुकेगा नही, लढेगा.....

Sun Aug 28 , 2022
  विविध ठिकाणी बैलपोळा व तान्हा पोळा मोठ्या उत्साहात साजराबळीराजाची गर्जना, झुकेगा नही, लढेगा….. कन्हान, ता.28 ऑगस्ट   पारशिवनी तालुक्यातील कन्हान शहरात व ग्रामीण भागात मागील दोन वर्षे कोरोना संसर्गजन्यामुळे खंडीत झाला होता तो यावर्षी बैलपोळा व लाकडी नंदीचा दोन दिवसीय पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामीण भागात […]

You May Like

Archives

Categories

Meta