खेळ मैदानात वेकोलि प्रशासनाने केली कोळसा मिश्रित माती डम्पिंग  खेळाचे मैदान उध्वस्त करित असल्याने खेडाळु व नागरिक संतप्त 

खेळ मैदानात वेकोलि प्रशासनाने केली कोळसा मिश्रित माती डम्पिंग

खेळाचे मैदान उध्वस्त करित असल्याने खेडाळु व नागरिक संतप्त

कन्हान,ता.२० मे

      वेकोलि कामठी व गोंडेगाव प्रशासना व्दारे गोंडेगाव वस्ती व कामगार वसाहती च्या मध्ये असलेले वेकोलि गोंडेगाव खेळाच्या मैदानात मध्यरात्री कोळसा मिश्रित माती डम्पिंग केले. संतप्त परिसरातील नागरिकांनी राष्ट्रीय कोयला खदान मजदुर संघ (इंटक) नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे यांच्या नेतुत्वात माती डम्पिंग अडवित आंदोलन करून मैदानात डम्पिंग केलेली माती जो पर्यंत हटवुन खेळाचे मैदान सुरक्षित करित नाही तो पर्यंत आंदोलन करण्याचा मानस व्यक्त केला.

          कन्हान, खदान परिसरात कुठेही खेळाचे मैदान नसुन वेकोलि कामठी कॉलरी येथील ब्लँक डॉयमंड स्टेडियम हे कामठी खुली कोळसाकरिता उध्वस्त केले . तर गोंडेगाव वस्ती व खदान वसाहतीच्या मध्ये असलेले एकमेव खेळाचे मैदान असुन येथे कामगार, त्यांचे पाल्य व गोंडेगाव वस्ती सह परिसरातील खेडाळु खेळतात. परंतु वेकोलि प्रशासनाने या मैदानात कोळसा मिश्रित मातीची डम्पींग करण्याचे ठरविल्याने इंटक कामगार संघटन व स्थानिय नागरिकांनी पत्र, निवेदन देऊन या अगोदरच्या माती डम्पिंगमुळे परिसरात धुळ व वायु प्रदुर्षण मोठ्या प्रमाणात असुन नागरिकांच्या आरोग्यास हानिकारक ठरत आहे. खेळाचे मैदान उध्वस्त करून डम्पिंग केल्याने मोठया प्रमाणात प्रदुर्षण होईल. यास्तव खेळाच्या मैदानावर माती डम्पिग करू नये. प्रबंधकांनी यावर चर्चा करून मार्ग काढु असे आस्वस्त केले, तरी सुध्दा वेकोलिने मध्य रात्री मैदानात कोळसा मिश्रित माती डम्पिंग सुरू केल्याने राष्ट्रीय कोयला खदान मजदुर संघ (इंटक) नागपुर क्षेत्र अध्यक्ष नरेश बर्वे यांना सकाळी बोलावुन नागरिकांनी आंदोलन करून माती डम्पिंग अडवुन धरली.

    यामुळे खेडाळु, खेळ प्रेमी गोंडेगाव व वसाहती मधिल नागरिकांची गर्दी वाढुन आंदोलन उग्र रूप धारण करू लागल्याने तहसिलदार प्रशांत सांगळे, मंडळ अधिकारी मेश्राम, नागपुर चे क्षेत्रीय कार्मिक प्रबंधक जी. सीतारमन, कामठी उपक्षेत्रीय प्रबंधक शरद दिक्षित, इंदर, कामठी खुलीखदान प्रबंधक बिरेन्द्र चौधरी, पटवारी भोसले त्वरित मैदानात पोहचले.

उद्या बैठक घेण्याचे सांगुन खदान चे कार्य सुरू करण्याचे बोलले परंतु आंदोलकांनी जो पर्यंत मैदानात टाकलेली माती उचलणार नाही तो पर्यंत खदानचे कार्य सुरू होऊ देणार नाही. असे इंटक पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी बजावले. प्रसंगी असंगठित कामगार वर्धा-नागपुर रीजन अध्यक्ष श्रीनिवास वियनवार, गोंडेगाव सरपंचा मनिषाताई दलाल, उपसरपंच सुनिल धूरिया, अरविंद सिंह, मनोज प्रसाद, इल्यास अहमद, पप्पु गुप्ता, भोला सिंह, अजित सिंह, प्रताप सिंह राजपूत, आनंद नायडु, साहिल गजभिये, प्रीतम राऊत सह स्थानिक नागरिक बहु संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

हुजूर मरियम अम्मा यांचा १०६ वा वार्षिक उर्स साजरा

Sun May 21 , 2023
हुजूर मरियम अम्मा यांचा १०६ वा वार्षिक उर्स साजरा कन्हान,ता.२० मे    हुजूर मरियम अम्मा साहेबा (र.अ) गाडेघाट जुनीकामठी ता.पारशिवनी जि.नागपुर येथे १०६ वा वार्षिक उर्स निमित्त तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करून मोठया उत्साहाने वार्षिक उर्स साजरा करण्यात आला.     नागपुर जिल्हयातील गाडेघाट, जुनीकामठी ता. पारशिवनी येथील प्रसिध्द […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta