शिवसेना कन्हान व्दारे देवेंद्र फडणविस व बावनकुळे‌ यांचा फोटोंच्या अपमान  शिवसेना मा.खासदार जाधव यांच्या नेतुत्वात शिवसैनिकांनी जाळला फळणवीसांचा पुतळा  

शिवसेना कन्हान व्दारे देवेंद्र फडणविस व बावनकुळे‌ यांचा फोटोंच्या अपमान

शिवसेना मा.खासदार जाधव यांच्या नेतुत्वात शिवसैनिकांनी जाळला फळणवीसांचा पुतळा

कन्हान,ता.१४ जुलै

    शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोचा भाजप पारशिवनी तालुका व कन्हान शहर पदाधिका-यांनी अपमान केल्याच्या निषेधार्थ शिवसेना मा.खासदार प्रकाश जाधव यांच्या नेतुत्वात शिवसैनिकांनी तारसा रोड चौक, कन्हान येथे देवेंद्र फडणविस व चंद्रशेखर बावनकुळे यांचा पुतळा जाळून जशास तसे उत्तर दिले.

     शिवसैनिकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून कंलक या शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे भाजप कार्यकर्त्ये ठाकरे विरोधात आक्रमक झाले होते. यापुढे शिवसेना पक्षप्रमुख  उध्दव ठाकरे व मातोश्रीच्या अपमान केल्यास शिवसेना पध्दतीने प्रखरपणे जशास तसे उत्तर देऊ ! असा इशारा देण्यात आला.

       शुक्रवार (दि.१४) जुलै ला तारसा रोड चौकात शिवसेना (उध्वव बाळासाहेब ठाकरे) कन्हान शहर व्दारे शिवसेना रामटेक माजी खासदार मा.प्रकाश जाधव, उपजिल्हा प्रमुख ग्रामिण प्रेम रोडेकर व कन्हान शहर प्रमुख प्रभाकर बावने यांच्या नेतुत्वात निषेध कार्यक्रम करून भारतीय जनता पार्टी कन्हान व पारशिवनी तालुका पदाधिका-यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटो चा अपमान केल्याने तसेच भाजप नेते देवेंद्र फडणविस व चंद्रशेखर बावनकुळे हे खालच्या स्तरावर बोलुन अपमान करित असल्याने शेकडो शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला.

    याप्रसंगी शिवसेना रामटेक माजी खासदार मा. प्रकाश भाऊ जाधव, उपजिल्हा प्रमुख ग्रामिण प्रेम भाऊ रोडेकर व कन्हान शहर प्रमुख प्रभाकर बावने, दिलीप राईकवार, हबीब शेख, आंनद कल्याणी, नेवालाल पात्रे, महेंद्र भुरे, रूपेश सातपुते, बंटी हेटे, जिवन ठवकर, शिव स्वामी, पुरूषोत्तम येलेकर, प्रविण गोडे, बाला खंगारे, गोविंद जुनघरे, लाला गुडधे, जितु तिवारी, फजित खंगारे, सिध्दार्थ घरडे, सुरेश आगुटलेवार, प्रदीप बावने, अर्जुन पोटभरे, भुरा पात्रे, महेंद्र खडसे, लखन पुरवले, चंदु पात्रे, अरूण खडसे सह शेकडो शिवसैनिकांनी निषेध व्यकत केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यपदी शंकर चहांदे यांची निवड जनतेचा हृदयात रामटेक लोकसभा उमेदवारीचा वारस शंकर चंहादे

Sun Jul 16 , 2023
जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यपदी शंकर चहांदे यांची निवड जनतेचा हृदयात रामटेक लोकसभा उमेदवारीचा वारस शंकर चंहादे कन्हान,ता.१५ जुलै      कन्हान नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष शंकर चहांदे यांची नागपूर जिल्हा दक्षता समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. निवड केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेश अध्यक्ष व […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta