बारावीच्या परीक्षेत कु.तनिशा राऊत तालुक्यात प्रथम

कन्हान, ता.२५
बारावीच्या नुकताच परीक्षेच्या निकाल लागल्याने पालकवर्गात मुलांना घेऊन कौतुक आनंदाचे वातावरण असुन महाविद्यालय संचालक मंडळ, अध्यक्ष व शिक्षकांच्या प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. तर महाविद्यालयीन विद्यार्थीगणात मध्ये एकदाचा निकाल लागल्याने सुटकेचा श्वास घेतला आहे.
तालुक्यात धर्मराज कनिष्ठ महाविदयालय कांद्री – कन्हान च्या निकाल ९८.८ टक्के लागला असून तालुक्यात प्रथम कु तनिशा सतीश राऊत हिने ९४.१७ टक्के पटकावला आहे तर तालुक्यात द्वितीय कु.रिया तरुणकुमार दास ९०.८३ टक्के बाजी मारली. यावेळी श्री नारायण विद्यालय इंग्लिश माध्यम हायस्कूल आणि ज्यू. कन्हान विज्ञान व वाणिज्य शाखेचा बारावीचा निकाल १००% लागला.
शालेय विज्ञान शाखेत कु.गीतांजली कुंवर गोपाल सिंग ८४.८३%, मंडळ महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम राहली. व्दितीय क्रमांक अंशकुमार राधेश्याम राऊत ७७.६७, तर आयुष राजेंद्र कनोजे ७३.१७ टक्के तृतीय क्रमांक पटकावला. याच व्यावसायिक शाखेत वेदिका लक्ष्मीनारायण महाल्ले ८८.५० टक्के, वैद्य स्थान कु. सेजल कमलेश पांजरे ८७.००%, आणि तिसऱ्या स्थानावर सोनाक्षी कैलास बर्वे ८६.८३%, संस्थेचे अध्यक्ष एन बाबूजी नानन आणि श्री नारायण विद्यालय हायस्कूल आणि जु. महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.अर्चना यादव, कनिष्ठ लेखिका कु.आशिया तबस्सुम, कु. कविता राय, सौ. ज्योती शर्मा, श्री राम भानारकर यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
भारतरत्न इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय कन्हान येथील कला शाखेच्या ६०.३३ टक्के तर वाणिज्य शाखेच्या ९१.४२ टक्के असा एकूण ७१.७२ टक्के लागला. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सर्व विद्यार्थ्यांना अभिनंदन व मार्गदर्शन करीत समोरच्या वाटचाली करीता शुभेच्छा दिल्या.
Post Views: 845