सावनेर पोलीस स्टेशन तर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सावनेर : नवरात्री पासुन सुरु झालेल्या सणासुदीच्या ,दिवाळीच्या निमित्त शहरातील नागरिकांचा उत्साह शांततेचे वातावरण लक्षात घेत , सावनेर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांनी समस्त शहरातील नागरिकांना सतर्क राहण्याची आणि शांततेत व सहकार्य करित दिवाळी सणाच्या शुभेच्छा देत खालील महत्वाच्या सुचना दिल्यात.

पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर

1) आपण बाहेरगावी जाताना घरामध्ये कोणते प्रकारचे मौल्यवान वस्तू ठेवू नये.
2) आपण बाहेरगावी जात असल्यास शेजारी लोकांना घराकडे लक्ष ठेवणे बाबत सांगावे.
3) रोख रक्कम घरात न ठेवता बँकेमध्ये जमा करावे तसे स्वतःजवळ बाळगू नये जास्तीत जास्त ऑनलाईन पैशाचा वापर करावा.
4) बाहेरगावी जात असताना घरासमोरील लाईट तसेच घरा मागचे लाईट सुरु ठेवावे तसेच कुलूप लावत असताना दरवाजाचा पडदा हा बाहेर काढून ठेवावे जेणेकरून कुलूप लावलेले दिसणार नाही.
5) आपल्या वस्तीमध्ये अनोळखी इसम कोणी फिरत असल्यास तसेच साधूच्या विषयांमध्ये किंवा इतर कोणीही संशयित असल्यास पोलीस ठाणे सावनेर सोबत संपर्क साधावा.
6) ऑनलाइन फ्रॉड पासून सावधान रहावे कोणत्या प्रकारचा OTP, CCV नंबर कोणाला सांगू नये.
7) एटीएम कार्ड वापराबाबत सतर्कतेने राहावे तसेच अनोळखी व्यक्तीला एटीएम कार्ड देऊ नये.
8) व्यापारी वर्गाने सतर्क राहून आपले दुकान सांभाळावे तसेच कोणत्या प्रकारची फसवणूक होणार नाही याकडे लक्ष ठेवावे सीसीटीव्ही कॅमेरे जास्तीत जास्त लावून घ्यावेत.
9) दागिन्यांची पॉलिश करून देतो असे सांगणाऱ्या वर विश्वास न ठेवता अशा लोकांची माहिती तात्काळ पोलीस ठाण्याला द्यावी.
10) जनावरांच्या चोरी संबंधाने विशेष लक्ष ठेवावे तसेच त्यांची सुरक्षेबाबत उपाययोजना करावी.
11) मोबाईल ॲपद्वारे कोणत्याही जातीधर्माच्या भावना दुखावणार नाही तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ फोटो व्हायरल होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी.
12) कोणावरी विश्वास ठेवू नये आम्ही पुलिस आहोत तुम्ही स्वतःच्या अंगावरचे दागिने काढून ठेवा किंवा कपड्यांमध्ये गुंडाळून ठेवा अशा प्रकारच्या लोकांवर विश्वास ठेवू नये.
13) आपल्या शेतातील गुरे ढोरे, कोंबड्या, शेती अवजारे यावर राखण ठेवावी.
14) प्रवास करताना किंवा गावामध्ये बाजारामध्ये फिरताना आपल्या स्वतःचा मोबाईल तसेच मौल्यवान वस्तूंवर लक्ष ठेवावे चोरांपासून सावधान रहावे.

दिवाळी निमित्त शुक्रवार आठवडी बाजारात खरेदारी करिता असंख्य नागरिकांना गर्दीत सावनेर पोलीस विभागातर्फे सम्पूर्ण बाजारपेठेत रूटमार्च करित जागोजागी पोलीस बंदोबस्त करित चिरीमिरी पोकिटचोर ,चेननस्कर्स, मोबाईल चोरटे याच्यांवर कडक निगरानी ठेवीत कोनतीही घटना घडु दिली नाही याबद्दल पोलीस विभागाचे सर्वत्र शब्दसुमनांनी स्वागत होत आहे.
पोलीस ठाणे सावनेर तर्फे सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सतर्क रहा जागरूक रहा असा संदेश सावनेर पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

युनिटी रियलिटीज कंपनी कर्मचाऱ्यांनी लूटला क्रिकेटचा आंनद  सीझन २ क्रिकेट सामन्यांत युनिटी रियलिटीज कंपनीचा जल्लोष 

Mon Dec 4 , 2023
युनिटी रियलिटीज कंपनी कर्मचाऱ्यांनी लूटला क्रिकेटचा आंनद सीझन २ क्रिकेट सामन्यांत युनिटी रियलिटीज कंपनीचा जल्लोष  नागपूर, ता.४   नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागात गरीब, सामान्य कुटुंबातील लोकांच्या भविष्यातील स्वप्नातील आशीयाना व रोजगार उपलब्ध करून देणारी युनिटी रियलिटीज कंपनीने हिवाळी गुलाबी थंडीची चाहूल लागताच कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्य व मनोरंजनासाठी क्रिकेट सामन्यांचे […]

You May Like

Archives

Categories

Meta