इंदिरा नगर कन्हान येथे घरफोडी : पोलिस प्रशासनावर ?

इंदिरा नगर कन्हान येथे घरफोडी

#) कन्हान पोलीस स्टेशन ला १७५५० रूपयांच्या मुद्देमाल चोरीचा गुन्हा दाखल.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत २ किमी अंतरावरील इंदिरा नगर कन्हान येथे अज्ञात चोरानी घराच्या दाराची कडी कोंडा तोडुन घरात प्रवेश करून एकुण १७,५५० रुपयांचा मुद्देमाल चोरी केल्याने कन्हान पोलीसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार बुधवार (दि.२९) डिंसेंबर २०२१ चे सायंकाळी ६ वाजता ते बुधवार (दि.५) जाने वारी २०२२ चे ८:३० वाजता दरम्यान भुषण रामभाऊ खानखुरे वय ५२ वर्ष राह. इंदिरा नगर कन्हान हे नागपुर ला गेले होते. त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरो ने घराचा दाराची कडी कोंडा तोडुन घरात प्रवेश करित कपाटात ठेवलेले चांदीचे व सोन्याचे दागिने एकुण किंमत १७,५५० रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याने
सदर प्रकरणी कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी भुषण रामभाऊ खानखुरे यांच्या तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० भांदवि अन्वये गुन्हा दाखल केला असुन पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस स्टेशन चे एपीआई सतिश मेश्राम हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान परिसरात १५ ते १८ वयोगटातील पाचव्या दिवसी २२७ विद्यार्थ्याचे लसीकरण

Sun Jan 9 , 2022
कन्हान परिसरात १५ ते १८ वयोगटातील पाचव्या दिवसी २२७ विद्यार्थ्याचे लसीकरण. कन्हान : – ३ जानेवारी पासुन १५ ते १८ वयोगटातील शालेय विद्यार्थ्याच्या लसीकरण सुरू करून पाचव्या दिवसी प्राथमिक आरोग्य केंद्र कन्हान व्दारे भारतरत्न इंदिरा गांधी विद्यालयात ११७ तर प्राथमिक आरोग्य केंद्र साटक व्दारे ११० विद्यार्थ्याचे लसीकरण करून कन्हान परिसरात […]

You May Like

Archives

Categories

Meta