बीकेसीपी शाळेत विज्ञान प्रदर्शनी व हस्तकला प्रदर्शनी संपन्न

बीकेसीपी शाळेत विज्ञान प्रदर्शनी व हस्तकला प्रदर्शनी संपन्न

कन्हान, ता.२४ जानेवारी 

   बीकेसीपी इंग्रजी माध्यम शाळेत विज्ञान प्रदर्शनी आणि हस्तकला प्रदर्शनी मध्ये इयत्ता १ ते १० वी च्या २०० विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रतिकृती सादर करून विज्ञान प्रदर्शनी व हस्तकला प्रदर्शनी थाटात साजरी केली.

    बीकेसीपी शाळा कन्हान चे संचालक राजीव खंडेलवाल यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधुन दरवर्षी प्रमाणे शाळेच्या परिसरात विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले. मुख्य अतिथी म्हणुन शाळेचे मान्यवर सदस्य अशोक भाटिया, शाळेचे माजी मुख्याध्यापक ठाकरे, नारायण विदयालयाच्या शिक्षिका कविता राय, शाळेच्या मुख्याध्यापिका कविता नाथ, प्रायमरी मुख्याध्यापिका रूमाना तुरक आदी प्रामुख्या ने उपस्थित होते.

   शाळेच्या विदयार्थ्यांनी उत्कृष्ट विविध वैज्ञानिक प्रतिकृती तयार करून त्यांचे उपस्थितांना कुशलता पूर्वक सादरीकरण करून दाखविले. यात २०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. चंद्रयान -३ या सर्वोकृष्ठ प्रतिकृतिला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले.

 

   विदयार्थ्यांच्या या कौतुकास्पद कामगिरीचे श्रेय शाळेचे विज्ञान शिक्षक विनयकुमार वैद्य सर, रुमाना तुरक, शमी अख्तर, शीतल बन्सोड, तूझीला अन्सारी, प्रमोद करंडे, नेहा राव यांना दिले जाते. विज्ञान प्रतिकृतीत बीकेसीपी प्रायमरी विद्यार्थ्याचाही सहभाग उत्साहजनक होता. तसेच हस्तकला प्रदर्शनी सुध्दा यावेळी घेण्यात आली होती. त्यात परिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका शाळेच्या शिक्षिका जोत्सना लांजेवार यांनी पार पाडली. विद्यार्थ्यांच्या या गुणांचे, त्यांच्या कार्याचे शिक्षक, शिक्षिका व पालकवर्ग हयानी करून सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

रायनगर हनुमान मंदीरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

Wed Jan 24 , 2024
रायनगर हनुमान मंदीरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट कन्हान,ता.२२ जानेवारी     कन्हान येथील राय नगर, हनुमान मंदिर कमेटी च्या वतीने (दि.२०) जानेवारी रोजी मंदिराचे स्वच्छ्ता अभियान अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शैलेश शेळके, निलकंठ मस्के,पवन माने व संपूर्ण कमेटी द्वारे राबविण्यात आले. मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली.    रविवार (दि.२१) जानेवारी […]

You May Like

Archives

Categories

Meta