पत्रकार माणिकराव वैद्य यांना भावपूर्ण श्रद्धांजलि

*मन हेलावणारी दुःखद घटना.*

आयुष्य कसे जगावे तर सदैव हसत खेळत, हाच संदेश मानिकभाऊ वैद्य यांनी त्यांच्या सहवासात असणाऱ्या लहान मोठ्यांना दिला.

एक उत्कृष्ट छायाचित्रकार म्हणून भाऊ सदैव सर्व नरखेड करांच्या हृदयात असतील यात शंकाच नाही.
उत्कृष्ट पत्रकार ते नरखेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष असा यशस्वी प्रवास त्यांनी पत्रकरीतेत केला. अष्टपैलू व्यक्तिमत्व अशीच त्यांची ओळख सर्वांमध्ये होती.
ते वयाने मोठे होते परंतु सदैव सर्वान सोबत मित्रा सारखेच राहीले.

भाऊ सदैव स्वाभिमानाने जीवन जगले. गरीब कुटुंबातून स्वतःचा परिवार सावरत त्यांनी मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार दिले.

सर्व मुलांचे उच्च दर्जाचे शिक्षण आटपून त्यांचे लग्न होवून सर्व आपापल्या परिवारात आनंदाने नागपूरला स्थायी झालेत.

पण काळाची नजर गेली आणि
नुकताच काही दिवसाअगोदर त्यांचा पोटाचा विकार वाढत असल्या बाबत कळले.
परंतु त्यावेळी कॅन्सर चे निदान व्हायचे होते.
आज ही मन हेलावणारी दुःखद वार्ता समजली.

भाऊ तुम्हाला भावपूर्ण श्रद्धांजली.
भाऊ च्या आत्म्यास चीर शांती लाभो.

संपूर्ण वैद्य कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

*भाऊ तुम्ही सदैव स्मरणात असाल.*

🙏🙏🙏💐💐💐🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

"रोजगार द्या "अन्यथा रस्त्यावर उतरु : अध्यक्ष राजेश खंगारे

Tue Sep 8 , 2020
सावनेर : आज दि. 8/9/2020 ला सावनेर नागपुर जिल्हा व सावनेर विधानसभा युवक काँग्रेस च्या वतीने सावनेर- कलमेश्वर विधानसभा अध्यक्ष राजेश खंगारे यांच्या नेतृत्वात तहसीलदार साहेब सावनेर यांना निवेदन देवून ” रोजगार दो ” अभियानाची शुरुवात करण्यात आली . निवेदन देते वेळी नागपुर जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष अमोल केने,महासचिव राहुल […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta