ड्राइव्ह अँड डाइन रेस्टॉरंट मधील हुक्का पार्लर वर धाड

ड्राइव्ह अँड डाइन रेस्टॉरंट मधील हुक्का पार्लर वर धाड

सावनेर :  स्थानिक गुन्हे शाखा , नागपूर ग्रामीणची कारवाई दिनांक 11.12.2021 रोजी ऑल आऊट ऑपरेशन दरम्यान आपले मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सावनेर उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना खात्रीशिर गोपनिय माहिती मिळाली की ,

पोलीस स्टेशन सावनेर अंतर्गत मौजा कवडस शिवारातील सावनेर – नागपूर महामार्गावरील ड्राईव्ह अँड डाईन रेस्टॉरंट येथे अवैधरित्या विदेशी दारूची विक्री व हुक्का पार्लर सुरू आहे अशी माहिती मिळाल्याने पोलीस स्टाफसह नमुद ठिकाण कार्यवाही केली असता तिथे विदेशी दारू व हुक्क्याचे साहित्य , हुक्का पॉट , चिलम , पाईप मिळुण आल्याने आरोपी 1 ) सिध्दार्थ सुनिल अग्रवाल वय 36 वर्षे , रा . सदर नागपू व 2 ) अजय मंगलसिंग राठोड वय 29 वर्षे रा . आर्णी जिल्हा यवतमाळ यांचे ताब्यातुन विदेशी दारू व हुक्क्याचे साहित्य ज्यामध्ये हुक्का पॉट , हुक्का चिलम , पाइप इत्यादी व पमिमद कंपनीचे प्रतिबंधीत सुगंधित तंबाखु असा एकुण 9,119 / – रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला . व आरोपीविरूध्द पोलीस स्टेशन सावनेर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे . – सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री विजयकुमार मगर , अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणिकर यांचे मार्गदर्शनात पोनि अनिल जिट्टावार , सहा . पोलीस निरीक्षक राजीव कर्मलवार , पोलीस नाईक आशिष मुंगळे , किशोर वानखेडे , उमेश फुलबेल , पोलीस शिपाई रोहन डाखोरे , अशुतोष लांजेवार यांनी पार पाडली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

केरडी शेत शिवारात शेतातील धानाची गंजीची आग लागुन राखरांगोळी : दोन लाख रूपयाच्या धानाचे नुकसान

Sat Dec 11 , 2021
केरडी शेत शिवारात शेतातील धानाची गंजीची आग लागुन राखरांगोळी #) शेतक-यांचे  दोन लाख रूपयाच्या धानाचे नुकसान.   कन्हान : – पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस स्टेशन पासुन सात किमी अंतरावर असलेल्या मौजा केरडी गावाजवळील पांजरा रिठी शेत शिवारातील    बंडु पतिराम हिगें यांच्या मालकीचे २ हे.३२ आर शेता त पिकविलेल्या धानाच्या गंजीला […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta