अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रक वर पोलिसांची कारवाई दोन आरोपी ताब्यात, तीस लाख सोळा हजार रु.मुद्देमाल जप्त

अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रक वर पोलिसांची कारवाई

दोन आरोपी ताब्यात, तीस लाख सोळा हजार रु.मुद्देमाल जप्त

कन्हान,ता.१६ एप्रिल
    कन्हान पोलीस हद्दीत मागील कित्येक महिन्या पासुन अवैध रेतीची चोरटी वाहतुक बिनधास्त पणे मोठ्या प्रमाणात सुरु आहे. कन्हान पोलीस आणि महसुल विभागा द्वारे कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या कार्यप्रणाली वर प्रश्न निर्माण झाले आहे.

    रविवार (दि.१४) एप्रिल दुपार च्या दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत परिसरात पेट्रोलिंग करित होते. मौजा जबलपुर- नागपुर महामार्ग वर टेकाडी पुलाखाली ट्रक च्या साहाय्याने अवैधरीत्या तस्करी सुरू असल्याची माहितीवरून पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन १० चक्का टिप्पर ट्रक क्रमांक.एम.एच-३१/एफ.सी-६००० आमडी फाटयाकडुन कन्हान मार्ग नागपुर कडे जातांना दिसला. त्याला टेकाडी पुलाखाली थांबवुन वाहनाची पाहणी केली असता टिप्पर ट्रक मध्ये रेती मिळुन आली. १० चक्का टिप्पर ट्रक चालक आरोपी सागर चेतन मासुरकर (वय २९), रोशन अशोक वर्मा (वय २१) दोन्ही रा.कोराडी यांनी आपल्या ताब्यातील ट्रक मध्ये विनापरवाना (रॉयल्टी) रेतीची चोरटी वाहतुक करीत असतांना मिळुन आले.

     पोलीसांनी आरोपींच्या ताब्यातुन एकुण ४ ब्रास रेती किंमत १६००० रु आणि १० चक्का टिप्पर ट्रक क्रमांक एम. एच-३१/एफ. सी-६००० किंमत ३०,००,००० रु असा एकुण ३०,१६००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
    कन्हान पोलीसांनी पो.शि.धनराज सुखदेव चौरपगार यांचा तक्रारी वरून तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सागर मासुरकर व रोशन वर्मा यांना अटक करण्यात आली असुन ट्रक मालक अशोक नगरारे यांचा शोध कन्हान पोलीस करीत आहे. कार्यवाही नागपुर ग्रामीण पोलीस अधिक्षक हर्ष ए.पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.संतोष गायकवाड, यांचा मार्गदर्शनात चालक मारबते, पो.शि.धनराज सुखदेव चौरपगार यांनी कारवाई यशस्वीरित्या पार पाडली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सत्कार करून जुन्या आठवणीस उजाळा

Tue Apr 16 , 2024
विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या सत्कार करून जुन्या आठवणींच उजाळा कन्हान, ता.१६ एप्रिल       शहरातील रायनगर येथिल सर्वात जुनी शैक्षणिक संस्था विकास हायस्कुल कन्हान येथे १९९९ मध्ये इयत्ता १० वीत शिक्षण घेतलेले. सध्या देशाच्या विविध भागात उच्च पदावर कार्यरत असलेले सुमारे ५० हुन अधिक विद्यार्थ्यानी शाळा सोडुन २५ वर्ष पूर्ण झाल्यामुळे माजी […]

You May Like

Archives

Categories

Meta