वयोवृद्धास लुटणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात ; सावनेर येथिल घटना

सावनेर : तहसिल कार्यालय सावनेर कडे जाणा – या मार्गाने जात असतांना एका अनोळखी इसमाने वयोवृद्धास थांबवुन तंबाखु खाणे करीता चुना मागीतला , न दिल्याने खिश्यातील त्यांच्या बळजबरीने 10,000 / – रू हिसकावुन पळुन गेला . हा प्रकार दि . 11 जानेवारी रोजी भरदिवसा 12:30 च्या सुमारास घडला . आनंदराव महादेव येलेकर , ( 65 ) . रा . तेलंगखेडी ता . सावनेर असे वयोवृद्ध फिर्यादीचे नाव आहे . अनोळखी आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन सावनेर येथे अप.क्र . 12 / 2022 कलम 392 अन्वये गुन्हा नोंद करीत स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व सावनेर पोलीसांनी दिनांक 12 / 01 / 2022 रोजी मिळालेल्या गोपनिय माहीतीच्या आधारे पोलीस स्टेशन सावनेर हद्दीत सापळा रचुन योगेश यशवंत कमाले , वय 23 वर्ष , रा . पहलेपार , सावनेर यास संयुक्तरित्या ताब्यात घेण्यात घेतले . विचारपुस दरम्यान त्याने गुन्हा केल्याचे सांगीतले . नमुद आरोपी हा सध्या पोस्टे सावनेरच्या ताब्यात असुन पुढील तपास सावनेर पोलीस करीत आहेत .

सदरची कार्यवाही मा . पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर नागपुर ग्रामीण , मा . अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणिकर ना . ग्रा . , उपविभागीय पोलीस अधिकारी पुजा गायकवाड यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे , सपोनि राजीव कर्मलवार , पो . हवा राजेंद्र रेवतकर , पोना आशिष मुंगळे , किशोर वानखेडे , उमेश फुलबेल , रोहन डाखोरे , विपीन गायधने , अमोल वाघ चालक अमोल कुथे तसेच पोलीस स्टेशन सावनेर येथील सपोनि सतीष पाटील , सपोनि शिवाजी नागवे , पोउपनि सागर करांडे , पोना निलेश तायडे , प्रकाश ठोके , पो . शि अशोक निस्ताने , सचिन लोणारे व सायबर सेल चे सतिश राठोड यांनी संयुक्तरित्या पार पाडली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

गुप्ता कोल वाशरीच्या धुळामुळे शेतीचे व ग्रामस्थाचे आरोग्यास नुकसान ; संबंधित अधिकाऱ्यांची भुमिकेवर ?

Fri Jan 14 , 2022
गुप्ता कोल वाशरीच्या धुळामुळे शेतीचे व ग्रामस्थाचे आरोग्यास नुकसान #) संबधित अधिका-यांनी सात दिवसात योग्य कारवाई करा, अन्यथा कंपनी विरोधात शेतक-यांचे आंदोलन – माजी खासदार प्रकाश जाधव कन्हान : – गुप्ता कोल वाशरीच्या कोळश्या धुळीने शेतक-यांच्या शेतपिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी आणि ग्रामस्थाचे आरोग्य धोक्यात आल्याने शेतक-यांनी वारंवार निवेदन देऊन […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta