मा.शाहीर राजेंद्र बावनकुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष नियुक्त

मा.शाहीर राजेंद्र बावनकुळे
राष्ट्रीय ओबीसी महासंघ चे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष नियुक्त

कामठी,ता.23 सप्टेंबर

   ओबीसी महासंघातर्फे नुकतेच खरबी येथील गुरुदेव संस्कार भवन येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार समारंभ आणी ओबीसी कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आले होते.
यावेळी शाहीर, सामाजिक कार्यकर्ता मा.राजेंद्र भीमराव बावनकुळे यांची राष्ट्रीय ओबीसी महासंघ नागपूर जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीपत्र राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.बबनराव तायवाडे, जिल्हा अध्यक्ष राजू चौधरी, राष्ट्रीय कोषाध्यक्ष गुनेश्वरजी आरीकर, राष्ट्रीय महिला अध्यक्ष सौ.सुशमा ताई भट, नागपुर शहर महिला अध्यक्ष सौ.वृंदा ताई ठाकरे, नागपुर शहर अध्यक्ष प्रो.राजेश राहाटे, नागपुर शहर महिला कार्याध्यक्ष सौ.अंजुषा बोधनकर यांच्या हस्ते देण्यात आले. प्रमुख अतिथी ज्येष्ठ वकिल फिरदोस मीरझा यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की, ओबीसी समाजाने आपले हक्क मिळविण्यासाठी एकत्रित यावे असे मत वकील मिरझा यांनी व्यक्त केले. राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी सांगितले की, देशातील साडेतीन हजार जाती एकत्र कशा येतील यासाठी ओबीसी कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले पाहिजे. तसेच ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध ओबीसी महासंघ काम करीत आहे. तेव्हा सर्व ओबीसी समाजानी एकत्र येऊन महासंघाची ताकत वाढवावी असे डॉ.बबनराव तायवाडे म्हणाले. यावेळी प्रवीण राऊत, डॉ.शरयू तायवाडे, डॉ. ए.जी.राऊत, देविदास बंड, भैय्याजी रडके यांना जगतगुरु संत तुकाराम महाराज यांची प्रतिमा शाल, श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रसंगी उपस्थित विनायकराव इगळे गुरुजी, संगीत नरड, विजय सराड, सुनील भाऊ बंड, गजानन भोयर, आदी मोठ्यासंख्येत मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कांद्री येथे राजस्व व विद्यार्थी समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन नागरिकांना यासारख्या शिबिराचा नक्कीच लाभ होईल - जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर

Fri Sep 23 , 2022
कांद्री येथे राजस्व व विद्यार्थी समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन नागरिकांना यासारख्या शिबिराचा नक्कीच लाभ होईल – जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर कन्हान,ता.23 सप्टेंबर    जिल्हा परिषद शाळा कांद्री येथे शुक्रवारी (ता.२३) सकाळी दहा ते पाच वाजता पर्यंत विद्यार्थी समाधान व राजस्व शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.      या शिबिराचे उद्घाटन आमदार […]

You May Like

Archives

Categories

Meta