गोंडेगाव प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतरण बळजबरीने करणे योग्य होणार नाही- किशोर गजभिये प्रकल्पग्रस्तांचे ८० टक्के स्थलांतरण झाले, २० टक्के स्थलांतरण अद्याप झालेले नाही 

गोंडेगाव प्रकल्पग्रस्तांचे स्थलांतरण बळजबरीने करणे योग्य होणार नाही- किशोर गजभिये

प्रकल्पग्रस्तांचे ८० टक्के स्थलांतरण झाले, २० टक्के स्थलांतरण अद्याप झालेले नाही 

कन्हान,ता.१७ जानेवारी

   वेकोलि व्दारे कार्यान्वीत गोंडेगाव खुली कोळसा खदान प्रकल्पांतर्गत पूनर्वसन व पूनर्स्थापन योजने अंतर्गत गोंडेगावचे अद्याप १०० % कार्यवाही न झाल्याने अनेक बिगर शेतकरी, कारागिरांच्या घरांना व अनेक भूमीहीन, शेत मजुरांचे जोर जबरदस्तीने घरे तोडुन स्थलांतरण करण्यास प्रतिबंध लावण्याची मागणी उपविभागीय अधिकारी रामटेक याना महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमेटी उपाध्यक्ष व माजी जिल्हाधिकारी भंडारा, नाशिक किशोर गजभिये यांना चर्चा करित निवेदन देऊन केली आहे.

     उपविभागिय अधिकारी रामटेक आपल्या पत्रा अन्वये गोंडेगाव ता. पारशिवनी जि. नागपुर येथिल उर्वरीत घरे व कुटूंबे यांना त्वरीत हलविण्यासाठी व तसे न झाल्यास शासन स्तरावरून उचित कार्यवाही करण्यासाठी पत्र दिलेले आहे. परंतु या संदर्भात वस्तु स्थिती अशी आहे की, अद्याप अनेक बिगर शेतकरी, कारागिरांच्या घरांना व अनेक भूमीहीन, शेत मजुरांच्या घरांना मोबदला देण्यात आलेला नाही. क्षेत्रीय योजना अधिकारी नागपुर क्षेत्र वेकोली यांनी त्यांचे पत्र कं. वेकोलि/क्षेमाप्र/नाग/योजना/आरटीआय/सीआयबी/२ड२३/ १११६ दि.२७/१२/ २०२३ अन्वये सहा. जनसुचना अधिकारी, वेकोलि यांना कळविले आहे की, ८०% ग्रामस्थांचे स्थलांतरण नविन पुनर्वसन स्थळी पूर्ण झालेले आहे. म्हणजेच २०% ग्रामस्थांचे स्थलांतरण अद्याप झाले नसून बाकी आहे. हे कुटूंबे अशी आहे की, ज्यांच्याकडे शेत जमिन नाही व ते ग्रामिण शेत मजुर व कारागिर आहेत. या लोकां च्या शेत जमिनी नसल्याने त्यांचा विचार पूनर्वसन योजनेतंर्गत पूर्णपणे करण्यात आलेले नाही. त्यामुळे या लोकांचे स्थलांतरण बळजबरीने करणे योग्य होणार नाही. उपरोक्त कारागिरांना कौशल्य प्रशिक्षण देवुन नविन ठिकाणी उचित साधन साम्रगी व सुविधा देवुन पूनर्वसित करावयाचे होते. पण अद्याप अशी कोणती ही कौशल्य विकासाची योजना वेकोलिने राबविली नाही. उपरोक्त बाब केवळ मासनेदाखल नमुद करण्यात आलेली आहे. या संदर्भाने गोंडेगावातील ग्रामस्थ, प्रकल्प बाधित कुंटूंबे व व्यक्ती यांच्याशी चर्चा केल्यानंतर खालील गोष्टी निदर्शनास येत की, सर्व प्रकल्प बाधितांना पूनर्वसनाच्या नविन गावी भूखंड वाटप करण्यात आलेले नाही,  सर्व प्रकल्पग्रस्तांच्या बांधिव घराचा व निवास स्थानाचा भूखंड, घरा भोवतीच्या वाडी सह नुकसान भरपाई मिळालेली नाही, सर्व प्रकल्प बाधितांच्या पूनर्वसन संदर्भात दिलासा राशी अद्याप पूर्णपणे मिळालेली नाही.  ज्या कुटूंबाची संपुर्ण जमीन प्रकल्पांतर्गत अधिग्रहित झाली आहे. त्या सर्व कुटूंबांना किमान कृषी मंजुरीची रक्कम पूनर्वसन नीति अंतर्गत अद्याप मिळालेली नाही,  ज्या घराच्या इमारतीत एकापेक्षा अधिक कुटूंबे राहत होती. प्रकल्पबाधित झाले आहे, त्या सर्व लोकांचे पुनर्वसन नविन गावठाण्यात करण्यात यावे.  नविन गावठाणा मध्ये प्रकल्प बाधितांचे पूनर्वसन करताना जनावरांचा गोठा, अन्नधान्य साठविण्यासाठी कोठार तसेच गावात सामुहिक उपक्रमासाठी जमिन इत्यादी अद्याप पूरविण्यात आली नाही.  शासकीय इमारती जसे की पोस्ट ऑफीस, पाळा, बँक, दवाखाना, तलाठी कार्यालय आदीचे बांधकाम करण्यात आलेले नाही. याशिवाय अनेक बाबी वेकोलि कडुन शिल्ल्क आहेत. करिता उपरोक्त बाबी झाल्या शिवाय जबरदस्तीने ग्राम स्थांचे स्थलांतरण करणे हे त्यांचेवर अन्यायकारक ठरेल आणि नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने उचित होणार नाही. गोंडेगाव पूनर्वसन योजनेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी नागपुर यांचे प्रतिनिधी म्हणुन व उपविभागीय अधिकारी म्हणुन आपण वेकोलिच्या दबावाला बळी न पडता शासनाच्या (केंद्र व राज्य) धोरणनुसार प्रकल्पग्रस्त, प्रकल्प बाधित शेतकरी, कारागिर, भूमी हीन शेतमजुर व शेतीवर अवलंबुन असलेले सर्व कुटूंब व लोकं यांचे समाधानपूर्वक पूनर्वसन झाल्याशिवाय त्यांचे जोर जबरदस्तीने घर हलविण्यात येवु नयेत आणि त्यांची राहती घरे तोडण्यात येवु नये, अशी विनंती महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटी उपाध्यक्ष व माजी जिल्हाधिकारी भंडारा, नाशिक या नात्याने पुनर्वसना चा अनुभवी जाणकार म्हणुन विनंती केली आहे. शिष्टमंडळात रविंद्र पहाडे, श्रीपाद भालेराव, त्रिलोक मेहर, देवाजी गजभिये, रामाजी वाघाडे आदी प्रामुख्या ने उपस्थित असुन सर्व संबधित अधिकारी यांना प्रतिलिपी पाठविण्यात आल्या आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शेतकरी कष्टकरी महासंघाची जनजागृती संवाद बैठक संपन्न

Thu Jan 18 , 2024
शेतकरी कष्टकरी महासंघाची जनजागृती संवाद बैठक संपन्न कन्हान,ता.१८ जानेवारी      पारशिवनी तालुक्यातील पेंच नदी काठावरील मेहंदी गावात शेतकरी, कष्टकरी महासंघाची जनजागृती संवाद बैठकीला गावातील शेतक-यानी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शेतक-यांच्या हितार्थ लढयात सहकार्य व सहभागी होण्याची हमी व समर्थन केले.      आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाचा उत्सव साजरा […]

You May Like

Archives

Categories

Meta