शिवसेने च्या श्रृंखलाबद्ध उपोषणाला कन्हान शहर विकास मंच ने केले ज़ाहिर समर्थन

*शिवसेने च्या श्रृंखलाबद्ध उपोषणाला कन्हान शहर विकास मंच ने केले ज़ाहिर समर्थन*

राज्य सरकार ने तात्काळ मागणी पुर्ण करावी – मंच पदाधिकारी

कन्हान – कन्हान येथील पुर्वी ग्रामपंचायतीचे कार्यकाळ रूपांतर लोकसंख्येच्या आधारावर सन २०१४ साली नगर परिषद अर्थात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणुन करण्यात आली असुन मागील ६ ते ७ वर्षाची कालावधी लोटल्यावर ही नगर परिषद मध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची रिक्त पदा वरील नेमणुक करण्यात आली नसल्याने, शिवसेना पक्षाद्वारे नागरिकांच्या जनहितार्थ दिनांक ५ जुलै ला शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या नेतृत्वात श्रृंखलाबद्ध उपोषण सुरु केल्याने कन्हान शहर विकास मंच मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांचा नेतृत्वात श्रृंखलाबद्ध उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी उपोषण स्थळी जाऊन उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांना समर्थन पत्र देऊन या उपोषणाला पांठिंबा दिला आहे .
कन्हान-पिपरी नगर परिषद येथे वेगवेगळ्या विभागात कार्यरत असलेले शासकीय-कर्मचारी पदाधिकाऱ्यांची कमतरता ही मागील बऱ्याच वर्षा पासुन भासत असुन शासन -प्रशासनाने या गंभीर विषया कडे लक्ष केंन्द्रीत न केल्याने कर्मचारी व शासकीय अधिकारी यांचे कमी अवकाश व रिक्त असलेल्या जागेच्या त्रास हा सर्व सामान्य नागरिकांना भोगावे लागत असून शहरातील विविध विकासशील कामांना अडथळा निमार्ण होत आहे .कन्हान – पिपरी नगर परिषद येथे रिक्त असलेल्या जागा तातडीने भराव्या या मागणी साठी शिवसेना पक्षा द्वारे ५ जुलै पासुन शिवसेना उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या नेतृत्वात कन्हान-पिपरी नगर परिषद समोर श्रृंखलाबद्ध उपोषण सुरु केले असुन उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकार्यांनी मंच अध्यक्ष प्रवीण गोडे यांचा नेतृत्वात ‍उपोषण स्थळी जाऊन उपजिल्हा प्रमुख वर्धराज पिल्ले यांच्या उपोषणाला समर्थन पत्र देऊन, स्थानिक राज्य सरकार मा. मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री यांनी या बाबदची तात्काळ नोंद घेऊन कन्हान नगर परिषद येथील योग्य शासकीय कर्मचारिंना पद्भार देऊन रिक्त जागा भरण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच च्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकार ला केली आहे.
या प्रसंगी कन्हान शहर विकास मंच कार्यकारी संस्थापक अध्यक्ष रुषभ बावनकर , मंच अध्यक्ष प्रवीण गोडे,उपाध्यक्ष संजय रंगारी,सचिव प्रदीप बावने, कोषाध्यक्ष हरीओम प्रकाश नारायण,ज्ञानेश्वर दारोडे,प्रकाश कुर्वे,मुकेश गंगराज,अक्षय फुले, शुभम मंदुरकर, सह आदि मंच पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

महिलेची बॅग हिस्कावुन पळालेल्या आरोपीला गुन्हे शाखा पोलीसांनी पकडले

Thu Jul 8 , 2021
महिलेची बॅग हिस्कावुन पळालेल्या आरोपीला गुन्हे शाखा पोलीसांनी पकडले #) कारवाई दरम्यान एकुण १,४१,५०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त.  कन्हान : –  पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर – मनसर महामार्गावरील वराडा शिवारात बंद टोल नाका जवळ एका अनोळखी आरोपीने दुचाकीने मागून येऊन फिर्यादीच्या पत्नीची बॅग हिस्कावून पळालेल्या आरो पींचा कन्हान पोलीस व स्थानिक […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta