वृद्धाश्रमातील २९ वृध्द कोरोनाबाधित : सावनेर येथिल घटना

वृद्धाश्रमातील २९ वृध्द कोरोनाबाधित

८ वृद्धांवर शासकीय कोरोना कोविड क्रेंदावर उपचार सुरू

सावनेर : सावनेर येथील स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमातील ४६ पैकी २ ९ . वृद्धांना कोरानाची लागण झाली आहे . यातील ८ वृद्धांना सावनेर येथील शासकीय कोविड केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती अधिकारी डॉ.संदीप गुजर यांनी दिली . सावनेर तालुक्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे . अशातच स्वामी विवेकानंद वृद्धाश्रमाला कोरोनाने विळखा घातल्याने चिंता व्यक्त केली जात आहे . या वृद्धाश्रमातील वृद्धांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे पत्र पाठविण्यात आले होते . मात्र प्रशासनाने प्राथमिकता देऊन तातडीने लसीकरण केले नाही असा व्यवस्थापनाचा आरोप आहे . स्थानिक प्रशासनाच्या वतीने या वृद्धाश्रमाला कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी कोणत्याही प्रकारच्या सुविधा पुरविल्या नाही . या वृद्धाश्रमात ऑक्सिजन सिलिंडर ,महत्त्वाच्या औषधी नाहीत . यासंदर्भात हे वृद्धाश्रम सचिव युगांत कुंभलकर यांना विचारणा केली असता त्यांनी यास दुजोरा दिला . वृद्धांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी शासनाने तातडीने सर्व सुविधा पुरवाव्यात अशी मागणी त्यांनी केली .

डाॅ. संदिप गुजर

(अधिकारी कोविड केंद्र सावनेर )

८ वृद्धांना आम्ही शासकीय कोवीड क्रेंदामध्ये अॅडमिट करून ऑक्सिजनची व्यवस्था करित उपचार सुरू केले त्यातील २ दोन वृद्धांना सुटी झाली असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे .
प्रत्येक वृद्धाश्रम व्यवस्थापकाने तेथील लोकांची काळजी घ्यायला हवी. वेळोवेळी त्यांची आरोग्य तपासणी करायला पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

सावनेर मध्ये साध्यापणे घरोघारी साजरी केली भगवान महावीर जयंती

Sun Apr 25 , 2021
*सावनेर मध्ये साध्यापणे घरोघारी साजरी केली भगवान महावीर जयंती* *कोरोनाच्या संकट दूर होवो यासाठी सावनेर जैन संघ द्वारा प्रार्थना करण्यात आली* सावनेर – सोमवारी भगवान महावीर यांची जयंती साध्यापणे घरोघरी उत्सवात साजरी केली. जैन धर्मात महावीर जयंतीचे पर्व महापर्व म्हणून मानले जाते. दरवर्षी सावनेर जैन संघातर्फे रथयात्रा काढली जाते व […]

You May Like

Archives

Categories

Meta