खोपडी शेत शिवारातुन एक्टीवा होन्डा दुचाकी  ची चोरी

खोपडी शेत शिवारातुन एक्टीवा होन्डा दुचाकी  ची चोरी

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत खोपडी (खेडी) शेत शिवारातुन दोन अज्ञात आरोपींनी एक्टीवा होन्डा मोटा र सायकल दुचाकी चोरून नेल्याने फिर्यादी च्या तक्रा री वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

       प्राप्त माहितीनुसार शुक्रवार (दि.१६) जुलै २०२१ ला ८ ते ८:३० वाजता दरम्यान वासुदेव गुलाब सतीको सरे वय ५२ वर्ष राह. चाचेर वार्ड नंबर ४ हा आपल्या घरी जाण्यास एक्टीवा होन्डा ४ जी ग्रे रंगाची दुचाकी क्र. एम एच ४० बी क्यु ०५८९ ने जात असते वेळी मौजा खोपडी गावाच्या जवळ गाडी रोडच्या बाजुला लावुन लघवी करीत असतांना दोन अज्ञात आरोपीने येऊन उभ्या दुचाकी ला चाबीने चालु करून चोरीने घेऊन पसार झाले. एक्टीवा होन्डा ४ जी ग्रे रंगाची दुचाकी क्र. एमएच ४० बी क्यु ०५८९ किंमत ६०,००० रुपयाची चोरी केल्याने फिर्यादी वासुदेव गुलाब सती कोसरे यांच्या तक्रारी वरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध अप क्र. २६५/२०२१ कलम ३७९ भा दंवि गुन्हा नोंद करून तपासात घेतला असुन गुन्ह्याचा पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्ष क अरुण त्रिपाठी यांच्या मार्गदर्शनात पो हवा नरेश वरखडे पोस्टे कन्हान हे करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Next Post

कांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली

Tue Jul 20 , 2021
कांद्री ला महिलांनी शितला मातेला साकडे घालुन गावपुजा संपन्न केली कन्हान : –  पावसाळयाच्या दिवसात पाऊस कमी पडुन गर्मीच्या उकडयाने नागरिक त्रस्त होत आहे तसेच जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या या महा मारी पासुन लवकर मुक्तता मिळावी याकरिता कांद्री येथील शितला माता मंदीरात भुमिपुत्र महिला स्वंयम सहायता समुहच्या माध्यमातून वरूण राजाला प्रसन्न करण्यास शितला मातेला साकडे […]

Breaking News

Archives

Categories

Meta