पहिला दिवस विद्यार्थ्यांचे ‘स्कुल चले हम’ ने साजरा

धर्मराज शैक्षणिक परिसरात शालेय प्रवेशोत्सव साजरा

२९ जुन शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांचे ‘स्कुल चले हम’ ने साजरा.

कन्हान : – गेल्या दोन वर्षात कोरोना परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शाळेत नियमित येणे बंद होते. त्या पार्श्व भुमीवर विद्यार्थ्यां मध्ये शाळेची ओढ आणि आस्था निर्माण होण्यासाठी धर्मराज शैक्षणिक संस्थेत प्रवेशो त्सव साजरा करण्यात आला.
” शिक्षणोत्सव २०२२” आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री धनंजय कापसीकर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन कांद्री ग्राम पंचायतचे सदस्य श्री चंद्रशेखर बाव नकुळे, कांद्री ग्राम पंचायतच्या सदस्या अरुणा हजारे, पालक प्रतिनिधी श्री विधिलाल डहारे, धर्मराज प्राथ मिक शाळेचे मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये, माध्य मिक विभागाचे ज्येष्ठ शिक्षक श्री दिनेश ढगे उपस्थित होते. सर्वप्रथम पाहुण्यांच्या हस्ते विद्येची देवता माॅ सरस्वती यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. तद्नं तर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प वर्षाव करून चाॅकलेट वाटप करित टाळ्यांच्या गजरात स्वा गत करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षा अभियानांत र्गत पाहुण्यांच्या हस्ते मोफत पाठय़पुस्तकांचे वाटप करण्यात आले. ” सहज मनाच्या संस्कारांना उत्तम आहे शाळा…. म्हणुनच अ, आ, इ शिकण्यास…. नियमित जा बाळा ” या विषयावर प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन करून सर्व विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन श्री नरेंद्र कडवे यांनी तर आभार श्री अमित मेंघरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री भिमराव शिंदेमेश्राम, श्री किशोर जिभकाटे, श्री राजु भस्मे, श्री सतीश राऊत, श्री तेजराम गवळी, श्री दामोधर हाडके, श्री प्रशांत घरत, सौ चित्रलेखा धानफोले, कु हर्षकला चौधरी, सौ माला जिभकाटे, सौ कोकीळा सेलोकर, सौ छाया कुरुटकर, सौ सरीता बावनकुळे, कु प्रिती सुरज बंसी, कु पूजा धांडे, कु अर्पणा बावनकुळे, कु शारदा समरीत व पालक वर्ग बहु संख्येने उपस्थित होते.

आदर्श हायस्कुल कन्हान येथे प्रवेशोत्सव साजरा

विद्यार्थांचा पाठ्यपुस्तक, गणवेश वितरण करून केला सत्कार.

कन्हान : – शासनाच्या आदेशा नुसार बुधवार पासुन सुरू झालेल्या शाळेच्या पहिल्या दिवशी आदर्श हाय स्कुल कन्हान येथे विद्यार्थांना पाठ्यपुस्तक, गणवेश व मिठाई वितरण करून सत्कार करीत प्रवेशोत्सव साज रा करण्यात आला.
बुधवार (दि.२९) जुन ला परिसरात इयत्ता १ ते १० पर्यंत शाळा सुरू झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी आदर्श हायस्कुल व आयडियल कांव्हेट हिंदी प्राथमि क शाळा कन्हान येथे प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे आयोज न करण्यात आले असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष हायस्कु ल च्या मुख्याध्यापिका श्रीमती सी एन मेश्राम, प्रमुख पाहुणे प्रायमरी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनिता देशमुख, संस्था सचिव भरत सावळे यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पुजन करून कार्यक्र माची सुरूवात करण्यात आली. त्यानंतर पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थांना पाठ्यपुस्तक, गणवेश व मिठाई वितरण करून सत्कार करीत प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

प्रोअक्टिव अबॅकस क्लासेस गोंडेगाव च्या विद्यार्थ्याचे सुयश

Wed Jun 29 , 2022
प्रोअक्टिव अबॅकस क्लासेस गोंडेगाव च्या विद्यार्थ्याचे सुयश कन्हान : – नॅशनल प्रॉअक्टिव अबॅकस स्पर्धेत वेको लि गोंडगाव वसाहत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयातील जिनियस प्रॉस्क्टिवे अबॅकस क्लासेस च्या सहा विद्यार्थ्यांनी प्राविण्य प्राप्त करून यश संपाद न केल्याने त्याना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. अमरावती येथे २६ जुन रोजी पार पडलेल्या […]

You May Like

Archives

Categories

Meta