भारतीय कलाकार शाहीर मंडळ तर्फे काटोल येथे रविवार ला कलाकारांचा मेळावा

भारतीय कलाकार शाहीर मंडळ तर्फे काटोल येथे रविवार ला कलाकारांचा मेळावा

काटोल,ता.२६


   काटोल तालुका आणि नरखेड तालुका च्या वतीने २९ ऑक्टोंबर २०२३ रविवार ला श्री हनुमान मंदिर, आय.यु.डी.पी.काटोल येथे सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत कलाकार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे. तरी सर्व शाहीर कलाकार यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

   कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन पळसराम महाराज यांच्या हस्ते करण्यात येईल. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाहीर राजेंद्र भीमराव बावनकुळे, राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ ऑल इंडिया, वृध्द कलाकार मानधन समिती सदस्य नागपूर जिल्हा, प्रमुख पाहुणे वासुदेव महाराज टापरे, देविदास महाराज ढोबळे, रामचंद्र महाराज काळबांडे, श्रीराम महाराज बारई, भगवंतराव डेहनकर, शाहीर भगवान लांजेवार, शाहीर चिरकुट पुंडेकर, सौ.जयश्री भूर्से माजी नगरसेविका काटोल, सौ.शालिनीताई महाजन माजी नगरसेविका काटोल.प्रमुख उप स्थिती मार्गदर्शक विनायक नागमोते, नंदकिशोर डांगोरे, नरेंद्र दंढारे यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन प्रदीप पाटील कुरेकर, रत्नाकर बोंद्रे, प्रकाश वंजारी, गोपाल भुर्से, शुभाष देशमुख, योगेश सावरकर, रामनाथ गोरे, सुनील बोंद्रे, ईश्वर उईके महाराज, प्रकाश राऊत, प्रभाकर भोयर, बाबाराव मुरोडिया, निंबा डफ्फर, ज्ञानेश्र्वर नंदघले, गजानन महल्ले, वनमाला खरालकर, ललिता कडू, विमल हजारे आणि कलाकार परिश्रम घेत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

भरदिवसा टेकाडी येथे पत्नीची निघृण हत्या

Tue Oct 31 , 2023
भरदिवसा टेकाडी येथे पत्नीची निघृण हत्या कन्हान,ता.३१    कन्हान पोलीस स्टेशन हद्दीतील महाजन नगर, टेकाडी येथे भरदिवसा पती ने पत्नीचा गळ्यावर चाकु ने वार करून निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.    पोलिसांच्या माहिती नुसार, महाजन नगर, वेकोली, टेकाडी येथील रहिवासी आरोपी अमित नारायण भोयर […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta