इंदर कोळसा खदान चा चोरी केलेला कोळसा पकडुन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

इंदर कोळसा खदान चा चोरी केलेला कोळसा पकडुन आरोपी विरूध्द गुन्हा दाखल

#) वराडा येथील शेतातील चोरीचा कोळसा पकडुन ३२,००० रुपयाचा मुद्देमाल जप्त.

कन्हान : – पोलीस स्टेशन अंतर्गत उत्तरेस ६ कि मी अंतरावर असलेल्या वराडा शिवारात राहुल सिंग यांच्या शेतात भुजंग महल्ले यांनी इंदर खुली कोळसा खदान येथील कोळसा चोरी करून जमा केल्याच्या माहीतीने वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी संतोष यादव हयानी घटनास्थळी पोहचुन कन्हान पोलीसाना तक्रार करून ६४९० किलो कोळसा किमत ३२ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त केल्याने कन्हान पोलीसांनी आरोपी भुजंग महल्ले विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


प्राप्त माहिती नुसार रविवार (दि.६) फेब्रुवारी २०२२ ला रात्री ९ ते ९:३० वाजता दरम्यान वेकोलि प्रभारी सुरक्षा अधिकारी संतोष इंद्रासेन यादव वय ३८ वर्ष राह. कामठी काॅलरी, मडीबाबा खदान नं.३ आणि सुरक्षा रक्षक सिराजुद्दीन अंसारी हे वराडा गावाजवळ पेट्रोलिंग करीत असतांना राहुल सिंग नावाच्या व्यक्ती ने माहिती दिली कि, वराडा गावा जवळील त्यांचा शेतात अवैध कोळसा जमा केलेला असुन हा कोळसा इंदर खुली कोळसा खदान येथुन चोरी करून जमा केलेला आहे. या माहिती वरून सुरक्षा अधिकारी संतोष यादव हे आपल्या सुरक्षा रक्षक सिराजुद्दीन अंसारी सोबत राहुल सिंग यांचा शेतात जाऊन पाहणी केली. तर तेथे‌ कोळश्या चा ढिग एका बाजुला दिसला. तेव्हा राहुल सिंग कडुन कळले की, जमा असलेला शेतातला हा कोळसा अवैद्य कोळसा टाल चालक भुजंग महल्ले वय ४८ वर्ष राह. टेकाडी याचा असल्याचे खात्रीशीर माहीती वरून सुरक्षा अधिकारी संतोष यादव यांनी इंदर खुली खदान मधुन ट्रक आणि पे लोडर च्या मदतीने शेतातील कोळसा ट्रक मध्ये भरून खदान च्या वजन काट्यावर वजन केला असता कोळस्याचे वजन ६४९० किंमत ३२,००० रुपयाचा मुद्देमाल मिळुन आल्याने कन्हान पोलीस स्टेशन ला फिर्यादी संतोष इंद्रासन यादव सुरक्षा अधिकारी यांच्या तोंडी तक्रारी वरून कन्हान पोलीसानी आरोपी भुजंग महल्ले च्या विरुद्ध अप. क्र ५२/२०२२ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक विलास काळे यांच्या मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

कन्हान येथुन अशोक मोहीते हरविला असल्याची कन्हान पोलिसात तक्रार

Thu Feb 10 , 2022
कन्हान येथुन अशोक मोहीते हरविला आहे कन्हान : – कळमना नागपुर येथुन तिघे जण बांगडया विक्री करिता आले असताना सायंकाळी दोघे जण परत आंबेडकर चौक येथे परत आले परंतु अशोक गणेश मोहीते न आल्याने नागपुर ला त्याच्या घरी पाहीले तसेच आजुबाजुला सगळी कडे शोधले असता मिळुन न आल्याने फिर्यादी अनिल […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta