कांद्री चा युवक ऋृषभ वैद्य नागपुर येथे हरवला

कांद्री चा युवक ऋृषभ वैद्य नागपुर येथे हरवला. 

कन्हान : – कांद्री येथील रहिवासी सुनिता मधुकर वैद्य यांच्या मुलगा ॠषभ मधुकर वैद्य यांची मानसिक स्थिति खराब असल्यामुळे उपचाराकरिता नागपुरला नेले असता तो लोकमत चौकातुन लापता झाल्याने शोध घेतले असता मिळुन न आल्याने मुलाच्या आई ने सिताबर्डी पोलीस स्टेशन नागपुर येथे हरविल्यांची तोंडी रिपोर्ट दिली आहे.

        कांद्री- कन्हान येथील सुनिता मधुकर वैद्य वय ४३ वर्ष हया आंगनवाडी मदतनीय म्हणुन काम करीत असुन मंगळवार दि.१८ मे २०२१ ला दुपारी १२ वाजता च्या दरम्यान त्यांच्या मुलगा ॠषभ मधुकर वैद्य वय १९ वर्ष यांची मानसिक स्थिती खराब असल्याने लोकमत चौक नागपुर येथे डॉ चंन्द्रशेखर मेश्राम यांच्या दवाखान्यात उपचाराकरिता नेले असता तो डॉक्टर च्या दवाखान्यात न येता सोबत असलेले संभाजी तुकाराम मस्के वय ५१ वर्ष रा. कांन्द्री यांच्या हाताला झटका मारून पळुन गेला. त्याचा आजु बाजुला शोध घेतला असता मिळुन न आल्याने आई सुनिता मधुकर वैद्य यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे हरवल्याची तोंडी रिपोर्ट दिली आहे. या मुलाचे वर्णन असे कि अंगात पांढरा फुल शर्ट त्याला काळी बटन व स्काय ब्लू जिंस पॅन्ट घातलेला असुन पायात शॅंन्डल घातली आहे. उंची ५ फुट, ६ इंच, साधारण केस काळे पांढरे, दाडी बारीक , मराठी बोलतो, वर्ण – सावळा, चेहरा – गोल, बांधा- साधारण आहे. पुढील तपास सीताबर्डी पोलीस नागपुर करित असुन कुणालाही मिळुन आल्यास पोलीस स्टेशला किंवा त्याती आई सुनिता वैद्य कांद्री-कन्हान मो न ८७८८०७३४१६ वर फोन करून संपर्क साधावा. 

हरवलेल्या ऋृषभ वैद्य चा फोटो. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Next Post

शिवनी जि. प. सर्कलमध्ये कोवीड चाचणी व जनजागृती , नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Sun May 23 , 2021
*शिवणी जि.प. सर्कलमध्ये कोव्हीड चाचणी व जनजागृती* *नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद* घाटंजी- तालुक्यातील शिवणी जिल्हा परिषद सर्कलमध्ये नागरिकांत जनजागृती करून कोव्हिड १९ ची चाचणी करून नागरिकांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी प्रशासनाकडून कसोशीचे प्रयत्न सुरू आहे याच उपाययोजनेचा एक भाग म्हणून दिनांक २१ मे रोजी तहसीलदार पूजा माटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवणी जिल्हा परिषद […]

You May Like

Breaking News

Archives

Categories

Meta